आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचा अकोल्यात मोर्चा

शांताराम काळे
Saturday, 10 October 2020

"सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,' "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चेकऱ्यांनी मुख्य रस्त्यावरून पोलिस ठाणे गाठले, तेथे पोलिसांनी गेट बंद केले. मोर्चेकऱ्यांनी गेटच्या बाहेरच ठिय्या दिला आणि भाषणे सुरू केली.

अकोले : आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजातर्फे आज अकोले शहरात मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा देत मोर्चाला सुरवात झाली. 

"सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,' "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चेकऱ्यांनी मुख्य रस्त्यावरून पोलिस ठाणे गाठले, तेथे पोलिसांनी गेट बंद केले. मोर्चेकऱ्यांनी गेटच्या बाहेरच ठिय्या दिला आणि भाषणे सुरू केली.

आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. महेश नवले, डॉ. संदीप कडलग, मच्छिंद्र धुमाळ, सुरेश खांडगे, दादा वाकचौरे, सोमनाथ नवले, विनोद हांडे, सुरेश नवले, स्वाती शेणकर, सुरेश गडाख, संजय वाकचौरे, अक्षय बोंबले, दत्ता नवले, राजेंद्र कुमकर, अक्षय देशमुख, स्वप्नील शिर्के आदींनी मनोगत व्यक्‍त केले. सुरेश नवले यांनी सूत्रसंचालन केले. सचिन नरोडे यांनी आभार मानले. 

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morcha of Sakal Maratha Samaj for reservation