esakal | हे गाव लई न्यारं, इथं महिलांच्या हाती आहे सारं! गडाख पाटलाचं हे असं हटके असतंय

बोलून बातमी शोधा

Morya Chinchore village is an ideal village due to Gadakh}

नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे गाव यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने दत्तक घेतलंय. या गावात राबविले जाणारे सर्व उपक्रम आदर्शवत असतात. एक गाव आदर्श करण्यासाठी काय यातना असतात त्या गडाख पाटलांना जाऊन विचारल्या पाहिजेत. कशाचाच बाऊ न करता, कोणत्याही राजकीय पदाविना त्याचं काम सुरू आहे.

हे गाव लई न्यारं, इथं महिलांच्या हाती आहे सारं! गडाख पाटलाचं हे असं हटके असतंय
sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे :  कोणत्याही गावात, राज्यात, नव्हे देशातच महिलांना आरक्षणाने कारभार करायची संधी दिली. असं असलं तरी सर्व कारभार त्यांचे कारभारीच बघणार. नाहीतर सासरे, दीर किंवा मुलेच सांभाळणार. एवढंच कशाला सभा, समारंभातही तेच मिरवणार... अशी तर गत आहे लोकशाहीची. मात्र, महाराष्ट्रात एक गाव लई न्यार हाय... ते म्हणजे आपल्या नेवाशातलं मोरया चिंचोरे. त्याला आता आदर्शपणाचं लेबलही लागलंय. या गावाला वेगळंपण कोणी दिले असेल तर ते यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने. या संकल्पनेचे प्रणेते आहेत ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख.

प्रशांत पाटील गडाख यांची सगळं काम हटके असतं. केवळ मिरवण्यापुरता त्यांचा विकास नस्तोय. काम करायचं तर चांगलंच, असा त्यांचा शिरस्ता असतो, एव्हाना हे उभ्या महाराष्ट्राला माहितीय झालंय.

हेही वाचा - अपघाताने केली पोलखोल, रस्त्यावर पसरले बीफ

विकासासाठी त्यांनी गाव दत्तक घेतलंय. ग्रामस्थांच्या  सहभागातून  'यशवंत प्रतिष्ठान  व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या गावचा सर्वांगीण विकास करत  दुष्काळी म्हणून ओळख असलेले  मोरया चिंचोरे गाव आता सर्वच क्षेत्रात 'सुजलाम, सुफलाम" तर केलेच, मात्र पुरुषप्रधान संस्कृतीमुळे सार्वजनिक जीवनात कायम दुय्यम स्थानावर राहिलेल्या महिलांना गावच्या विकासात व प्रत्येक उपक्रमासह सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातही संधी उपलब्ध करून दिली.
विशेष म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशांत पाटील गडाख यांच्या संकल्पनेतून आदर्शगाव मोरया चिंचोरेत ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच, वाचनालय, तंटामुक्ती, शाळा, वन व्यवस्थापन, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी  पदासह समित्यांवर महिलाच कामकाज पहातात.

गावातील विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण, ध्वजारोहनासह विविध धार्मिक, सामाजिक कार्यासाठी महिलांचा मान दिला जातो. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवस आदर्श गाव मोरया चिंचोरेत महिलादिनी कृतीतूनच साजरा केला जातो. 
नेहमीच वेगवेगळया सामाजिक उपक्रम राबविणारे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे माध्यमातून व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख  यांच्या  संकल्पनेतून आज सोमवारी (ता. ८) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदर्शगाव मोरया चिंचोरे येथे २५१ महिलांच्या हस्ते १ हजार वृक्षांचे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून (मोरया चिंचोरे ता नेवासा) येथे महिला सक्षमीकरणाचे काम 365 दिवस सुरू असते. यशवंत सामजिक प्रतिष्ठान व प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून मोरया चिंचोरे गावाची आदर्श वाटचाल आहे, ती सर्वांना प्रेरणादायी अशी आहे. या गावाची ग्रामपंचायत निवडणूक यावेळी बिनविरोध झाली ही बाब ही विशेष आहे.

वृक्षारोपणात सर्वच क्षेत्रातील महिलांचा सहभाग 

महिला दिन महिलांच्या हस्ते आज मोरया चिंचोरे येथे वृक्षारोपनात कडुनिंब, जांभूळ, चिंच,वड, पिंपळ या देशी वृक्षांचा समावेश होता.  विशेष म्हणजे या उपक्रमात शेतमजूर , शेतकरी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, प्राध्यापक, शिक्षिकासह सामाजिक , सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील  महिलांसह विविध गावातील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या महिला सदस्या यावेळी उपस्थित होत्या. 

"जागतिक महिला दिनानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे वतीने व अध्यक्ष  प्रशांत पाटील  गडाख यांच्या संकल्पनेतून आदर्श गाव मोरया चिंचोरे येथे महिलांच्या हस्ते  वृक्षारोपण करून नारी शक्तीचा गौरव केला गेला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोरया चिंचोरे गावात महिलांना दिला जाणारा मानसन्मान, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यात दिले जाणारे स्वतंत्र हे नारी शक्तीला  प्रेरणा देणारे आहे. 
- कीर्ती बंग व  मीनल दहिफळे, सोनई

"प्रशांत गडाख यांच्या नेतृत्वाखाली व  गावातील सर्वच नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शगाव मोरया चिंचोरेत महिला राज आहे. आम्हाला दिला जाणारा मानसन्मान व स्वातंत्र्यमुळे आम्हाला सर्वच क्षेत्रात काम करायला संधी उपलब्ध झाली. याचे सर्व श्रेय प्रशांत गडाख व ग्रामस्थांना  आहे.
- जयश्री मंचरे, सरपंच, मोरया चिंचोरे, ता. नेवासे