

Festival Turns Fatal: Mother and Son Killed in Bike–Car Accident
Sakal
पाथर्डी : महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी निघालेल्या मायलेकावर काळाने झडप घातली. कोरडगाव रोडवरील टाकळी फाटा येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात उमेश जगन्नाथ औटी (वय ४४) व त्यांच्या आई कौशल्या जगन्नाथ औटी (वय ६६, रा. औटीवस्ती, पाथर्डी) यांचा मृत्यू झाला.