
जामखेड : इरकलचं नऊवारी लुगडं, मराठमोठी चोळी, नाकावर नथ अन् डोक्यावर पदर. बुधवारी (ता. १६) लेकाचं कौतूक पहायला, एक आई पोहोचली थेट विधानभवनात. डोळ्यात तेज होतं, चेहऱ्यावर हास्याचे भाव होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात एक तृप्त समाधान घेऊन ही आई थेट आमदारांचं कामकाज पहायला दाखल झाल्या. या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून, विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शंकर शिंदे होत्या.