
कुकाणे: शहापूर घोटी विशाखापट्टणम राज्यमार्ग क्रमांक ५० अकोले ते शेवगाव गेवराई मार्गे विशाखापट्टणम या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाची मंजुरी देऊन चौपदरीकरण करावे, अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पावसाळी अधिवेशनात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.