श्रीगोंदे : जिरवाजीरवीचे राजकारण करण्यापेक्षा तालुक्याचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाणार असून, प्रसंगी स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याची आमची तयारी सुरू असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.