
पारनेर : महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी एकही केंद्रीय विश्वविद्यालय नाही.जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्यात्मक वाढ आणि उच्च शिक्षणाची गरज लक्षात घेता, एका केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना काळाची गरज आहे. त्या साठी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय स्थापन करण्यात यावे अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले.