MP Nilesh Lanke : अहिल्यानगरच्या रेल्वे प्रश्नांवर खासदार नीलेश लंके आक्रमक; रेल्वे स्थायी समितीत रखडलेल्या प्रकल्पांना कालमर्यादेची मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे विकासाला गती द्या, केवळ आश्वासन नको तर प्रत्येक प्रकल्पाची निश्चित तारीख जाहीर करा.
MP Nilesh Lanke

MP Nilesh Lanke

sakal

Updated on: 

पारनेर - अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे विकासाला गती द्या, केवळ आश्वासन नको तर प्रत्येक प्रकल्पाची निश्चित तारीख जाहीर करा, अशी आक्रमक भूमिका खासदार नीलेश लंके यांनी रेल्वे स्थायी समितीच्या बैठकीत मांडली. पुणे-अहिल्यानगर लोकल, नवीन रेल्वे मार्ग, बंद पडलेल्या पॅसेंजर सेवा आणि प्रवासी सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले.

रेल्वे प्रशासनाने प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती आणि पूर्णत्वाची तारीख जाहीर करावी, मागण्या कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी लंके यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com