मराठा समाजाची बाजु लोकसभेत आपण स्वत: भक्कमपणे मांडणार : शिवसेना खासदार लोखंडे

गौरव साळुंके
Thursday, 1 October 2020

मराठा आरक्षणाबाबत शिवसेना सकारात्मक असुन मराठा समाजाची बाजु लोकसभेत आपण स्वतः भक्कमपणे मांडणार असल्याची, ग्वाही खासदार सदाशिव लोंखडे यांनी दिली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : मराठा आरक्षणाबाबत शिवसेना सकारात्मक असुन मराठा समाजाची बाजु लोकसभेत आपण स्वतः भक्कमपणे मांडणार असल्याची, ग्वाही खासदार सदाशिव लोंखडे यांनी दिली. 

हेही वाचा : संगमनेरमधील व्यापारी संकुलासह 73 इमारती धोकादायक; 107 जणांना नोटिसा
शिवसेना खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला. असुन यानिमित्त खासदार सदाशिव लोखंडे यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने येथील मराठा तरुणांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. आरक्षणाचा तोडगा निघेपर्यंत पोलिस भरतीला स्थगिती द्यावी, केंद्राने मराठा समाजाला दिलेले आरक्षण समाजाला मान्य नसल्याचे मराठा तरुणांनी सांगितले.

त्यावर खासदार लोखंडे म्हणाले, समाजाच्या भावना समजुन असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळणार आहे. तसेच इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे सध्या कुणीही आरक्षणावरुन राजकारण करु नये, राजकीय टोला खासदार लोखंडे लगावला आहे. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडधे, अॅड. संदीप चोरगे, संतोष ठोकळ, श्रीकांत शेळके, अमोल जैत, आकाश मोरगे, योगेश मरकड, अनिकेत धनगे, ऋषिकेश मोरगे उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sadashiv Lokhande said that Shiv Sena is positive for Maratha reservation