esakal | पंखे, पलंग, स्वच्छतागृहाची त्वरीत दुरुस्ती करण्याची खासदार लोखंडेची तहसीलदारांना सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sadashiv Lokhande visits Covid Center at Newasa Phata

शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासे फाटा येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. दरम्यान येथील रुग्णांना मिळत असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेत त्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या.

पंखे, पलंग, स्वच्छतागृहाची त्वरीत दुरुस्ती करण्याची खासदार लोखंडेची तहसीलदारांना सूचना

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासे फाटा येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. दरम्यान येथील रुग्णांना मिळत असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेत त्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या.

नेवासे फाटा परिसरातील समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह येथे असलेल्या कोविड केअर सेंटरला खासदार लोखंडे यांनी भेट दिली. यावेळी तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी,  पोलिस निरिक्षक रणजित डेरे उपस्थित होते.

खासदार लोखंडे यांनी येथील जेवण व्यवस्थेसह केअर सेंटरमध्ये असलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. पाच महिन्यांपासून तालुक्याचे कोविड केअर सेंटर असून येथील पंखे, शौचालये, पलंग- गाड्यांची दुरवस्था झाल्याचे पाहून खासदार लोखंडे यांनी तहसीलदार रुपेश सुराणा दुरुस्ती बाबत व विलगिकरनात असलेल्या व्यक्ती व रुग्णांना येथेच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

पोलिस निरीक्षक रणजित डेरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी  यांना केअर सेंटरमध्ये बाहेरची कोणतीही वस्तू, पदार्थ येऊ न देण्याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. 

खासदार लोखंडे यांच्या समवेत युवा सेनेचे जिल्हा प्रमुख निरज नांगरे, शिवसेनेचे उपजिल्हा  प्रमुख हरीभाऊ शेळके, तालुका प्रमुख मच्छिन्द्र म्हस्के, उपप्रमुख मकरंद राजहंस, शहर प्रमुख नितीन जगताप, भाजपाचे तालूकाध्यक्ष नितीन दिनकर, सेनेचे नारायण लष्करे, मुन्ना चक्रनारायण उपस्थीत होते. 

होम क्वारंटाइन केल्याचा राग व वस्तूची मोडतोड
मार्च ते जून या कालावधीत शहरातून गावी येणाऱ्यांना १४ दिवसांसाठी याच इमारतीत होम क्वारंटाइन करण्यात येत होते. दरम्यान आपण ठणठणीत असतांना आपल्याला 'होम क्वारंटाइन' करून प्रशासन अन्याय करत असल्याची चुकीची भावना मनात ठेवून प्रशासणावरचा राग अनेकांनी येथील खोल्यांतील पंखे, विजेच्या वायर, शौचालय, पलंग आदी साहित्यांची मोडतोड करून व्यक्त केल्याचे प्रकार येथे घडले.

कोरोनाच्या विरोधात रात्रंदिवस लढा देणारे तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनाही अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. आपण प्रशासनावर उपकारच करीत आहोत या अर्वीभावात होम क्वारंटाइन झालेल्या अनेक व्यक्ती वागतांना अनेकांनी अनुभवले. 

संपादन : अशोक मुरुमकर