esakal | खासदार विखे पाटील घेणार शरद पवारांची भेट, सर्वांचे लागलं लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

MP Vikhe Patil will meet Sharad Pawar

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, ""पारनेर, राहुरी व नगर या तीन तालुक्‍यांतील गावांचा हा प्रश्न आहे. पारनेरमधील 75 टक्के, राहुरीतील 55 टक्के व नगर तालुक्‍यातील 65 टक्के शेतकऱ्यांनी न्यायालयात हा विषय नेण्याच्या माझ्या भूमिकेला सहमती दाखविली आहे.

खासदार विखे पाटील घेणार शरद पवारांची भेट, सर्वांचे लागलं लक्ष

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः के. के. रेंज लष्करी सरावासाठी तीन तालुक्‍यांतील 23 गावांच्या जमिनींचे भूसंपादन लष्कराकडून होणार नाही; पण जमीनवापर होणार आहे. त्यामुळे या वापराचा मोबदला मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांनी ती नामंजूर केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर न्यायालयात जाता येऊ शकते व याच मुद्द्यावर मार्गदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांची आपण दिल्ली अधिवेशनाच्या काळात भेट घेणार आहोत, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

लष्कराच्या के. के. रेंज या सराव क्षेत्राच्या भूसंपादनावरून व त्याच्या श्रेयवादावरून राजकारण होत असल्याने, त्याला कंटाळून नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन, के. के. रेंजबाबतच्या एका मुद्द्याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेण्याची तयारी दर्शविली आहे. खासदार डॉ. विखे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. 

हेही वाचा - रोहित पवारांच्या मातुःश्रींची प्रतिज्ञा होतेय व्हायरल

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, ""पारनेर, राहुरी व नगर या तीन तालुक्‍यांतील गावांचा हा प्रश्न आहे. पारनेरमधील 75 टक्के, राहुरीतील 55 टक्के व नगर तालुक्‍यातील 65 टक्के शेतकऱ्यांनी न्यायालयात हा विषय नेण्याच्या माझ्या भूमिकेला सहमती दाखविली आहे.

के. के. रेंज भूसंपादनावरून मध्यंतरी गरजेपेक्षा जास्त राजकारण झाले. यातील काही गोष्टी सोडविण्याच्या मार्गावर मी होतो; पण शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून अफवा पसरविल्या गेल्या. त्यात मूळ प्रश्न मागे राहिला. त्यामुळे श्रेयवादात न पडता पवारांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत असेल तर आपण तसे करू; पण या विषयाला पक्षीय रंग देणे योग्य नाही.'' 

संपादन - अशोक निंबाळकर