

MPSC State Service 2024
esakal
अहिल्यानगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ मधून पुरवठा निरीक्षण अधिकारी पदासाठी निवड झालेल्या ७६ उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. याच परीक्षेतून निवड झालेल्या अन्य संवर्गातील अधिकाऱ्यांना ११ ऑगस्ट २०२६ रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले. मात्र, पुरवठा निरीक्षण अधिकारी पदावरील उमेदवार अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.