esakal | महावितरण कंपनीची पारनेरमध्ये साडेतीनशे कोटींची थकबाकी
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL owes Rs 350 crore in Parner

व्यापारी, ग्राहकांकडील थकबाकी एक कोटी 68 लाख, तर औद्योगिक विभागाची तीन कोटी 23 लाख आहे. काही राज्यांमध्ये कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा केला जातो, तसा आपल्याही राज्यात करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

महावितरण कंपनीची पारनेरमध्ये साडेतीनशे कोटींची थकबाकी

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर : तालुक्‍यात महावितरण कंपनीची 357 कोटी 91 लाखांची थकबाकी आहे. यात सर्वाधिक थकबाकी कृषिपंपांची (307 कोटी 44 लाख) आहे. थकबाकीत यानंतर पथदिवे (32 कोटी 38 लाख) व घरगुती ग्राहकांचा (चार कोटी 10 लाख) क्रमांक लागतो. वसुलीसाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करून ग्राहकांना बिल भरण्यास सांगण्यात येईल. 

व्यापारी, ग्राहकांकडील थकबाकी एक कोटी 68 लाख, तर औद्योगिक विभागाची तीन कोटी 23 लाख आहे. 
काही राज्यांमध्ये कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा केला जातो, तसा आपल्याही राज्यात करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

यापुढे वसुली अधिक असलेल्या ग्राहकांसाठी वीजवितरण कंपनी चांगल्या सुविधा उपलब्ध करून विविध योजना राबविणार आहे. त्या तालुक्‍यात राबविण्यासाठी उपअभियंता प्रशांत आडभाई प्रयत्नशील आहेत. तालुका पातळीवर लवकरच सर्वपक्षीय व सकारात्मक विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन, ही योजना अमलात आणण्याचा आडभाई यांचा विचार आहे. 

अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाने सर्वच व्यवहार थंडावले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी अडचणीत आहेत. शेतमालाला भाव नाही, तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. उद्योग- व्यवसायही कोरोना संकटामुळे अनेक दिवस बंद होते. 

तालुक्‍यातील थकबाकी : 
घरगुती ग्राहक ः 21 हजार 868 (4.10 कोटी), 
व्यापारी ग्राहक ः एक हजार 963 (1.68 कोटी), 
औद्योगिक ग्राहक ः 533 (3.23 कोटी) 
 

वीजबिलांच्या वसुलीसाठी आम्ही शेतकरी, औद्योगिक विभाग, व्यापारी व घरगुती ग्राहकांचे प्रबोधन करणार आहोत. स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेतेमंडळींच्या मदतीने एकत्रित बैठक घेऊन ग्राहकांना बिल भरण्यास प्रवृत्त करणार आहोत. वसुलीसाठी फक्त वीजवितरणचे अधिकारीच नव्हे, तर सामाजिक चळवळ उभी करणार आहोत. वसुली वाढल्यावर नवनवीन योजना महामंडळ देणार आहे. 
- प्रशांत आडभाई, उपअभियंता, पारनेर .

संपादन - अशोक निंबाळकर

loading image