esakal
Ladki Bahin Yojana
अहिल्यानगर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेसाठी आता केवायसी करावी लागणार आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी दर महिन्यात काही ना काही जाच सहन करावा लागत आहे. आता केवायसीच्या (Ladki Bahin Yojana KYC) कचाट्यात त्यांना अडकावे लागणार आहे. ती न केल्यास त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. मागील महिन्यात केलेल्या तपासणीत साडेसतरा हजार महिला अपात्र ठरल्या.