
राहुरी : मुळा धरणाचे सर्व अकरा वक्रीदरवाजे आज (बुधवारी) सायंकाळी साडेपाच वाजता प्रत्येकी १५ सेंटीमीटर उघडण्यात आले. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते दरवाजांच्या विद्युत यंत्रणेची कळ दाबण्यात आली. धरणातून तीन हजार क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी जायकवाडी धरणासाठी मुळा नदीपात्रातून झेपावले.