मुळा साखर कारखान्याचा हंगाम धुमधडाक्यात सुरू

विनायक दरंदले
Thursday, 29 October 2020

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून त्या त्या गटात उस तोडणी कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आरोग्य सुविधाही ठेवण्यात आली आहे. असे 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी सांगितले.

सोनई: मुळा सहकारी साखर कारखान्याचा ४३ वा उस गळीत हंगाम धुमधडाक्यात सुरु झाला असुन उसाचे ट्रॅक्टर, ट्रका व बैलगाड्यांनी रस्ते गजबजले आहेत. तालुक्यात यंदा प्रथमच पाऊस भरभरुन झाल्याने नियोजित वेळेनुसार हंगाम उशिरा सुरु करण्यात आला.

या वर्षी कार्यक्षेत्रात मुबलक ऊस असल्याने या सर्वात मोठ्या गळीत हंगामाबाबत मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर शेतकी विभागाने रोज, आठवडा व महिन्याचे व्यवस्थित नियोजन केले आहे.

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून त्या त्या गटात उस तोडणी कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आरोग्य सुविधाही ठेवण्यात आली आहे. असे 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी सांगितले.

सध्या रस्त्याच्या कडेला असलेल्या उस तोडीला सुरुवात करण्यात आली आहे.सोनई कडे येणारे रस्ते उसाच्या वाहनाने गजबजले आहेत. पहाटेपासूनच बैलगाड्यांचा खळखळाट सुरु झाला आहे.तोडणी कामगारांचा संसार कार्यक्षेत्रात दाखल झाला आहे. 
कारखान्याच्या गट परीसरात चहा, नाश्ता, खानावळ, किराणा व भाजीपाल्याच्या दुकाना लागल्या आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mula sugar factory season begins in earnest