
-विनायक दरंदले
सोनई : मुळा साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांतच रोज आठ हजार टन उसाचे गाळप सुरू झाले. मात्र, मध्येच अवकाळी पाऊस आल्याने दोन दिवस गाळपाच्या गतीला काहीसा ब्रेक लागला होता. आता पुन्हा वातावरण स्वच्छ झाल्याने कार्यक्षेत्रात ऊसतोड व वाहतुकीला गती देण्यात आली आहे.