अकबराच्या दरबारात हा होता बिरबलापेक्षाही विद्वान... नगरच्या संग्रहालयात सापडले रेखाचित्र, दस्तावेज

Mulla Do Pyaja was smarter than Birbal
Mulla Do Pyaja was smarter than Birbal

नगर ः अकबर बादशहा आणि बिरबल यांच्या कथा संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. साहित्यिकांनी त्यावर विपुल लिखाण केलं आहे. बिरबल हजर जबाबी होता, चतुर होता. बादशहाच्या नवरत्नांपैकी एक होता. त्याच्या बुद्धिचातुर्यांवर इतर दरबारी जळत होते. त्यामुळे त्याच्यातील न्यून दाखवण्याचा प्रयत्न केला जात असे. मात्र, या बिरबलाबाबत इतिहासाकडे फारसे पुरावे नाहीत. किंवा ते उजेडात आलेले नाहीत.

बिरबलाव्यतिरिक्त फैजी या रत्नाचे नाव इतिसातील पुराव्यात सापडते. मात्र, इतरांच्या नावाबाबत सर्वसामान्य वाचकांना फारशी माहिती नाही. बिरबलापेक्षाही एक व्यक्ती हुशार होती. आणि तिने आपल्या गायनाने तसेच बुद्धिमत्तेने बादशहाचे मन जिंकले होते.

अकबर बादशहा उदारमतवादी होता. त्याने हिंदूंबाबतही सहिष्णू धोरण ठेवले होते. तो कलेचा चाहता होता. वेगवेगल्या कलेत जे लोक पारंगत आहेत. त्यांना आपल्या दरबारात त्याने स्थान दिले होते. हे केवळ कलाकार नव्हे तर रत्न आहेत, असे तो म्हणायचा. ही नऊ वेगवेगळ्या कलांमधील निपुण कलाकार मंडळी होती. तीच नवरत्न म्हणून अोळखली जातात. 

ती नवरत्नांपैकी एक असलेले व्यक्ती प्रचंड हुशार होती. बिरबलाला जमले नाही ते या व्यक्तीने केले. त्यामुळे बिरबल आणि या व्यक्तीमध्ये जुगलबंदी व्हायची. मात्र, त्याच्याविषयी इतिहासात फारसे लिहिले गेले नाही. त्यामुळेच तो फारसा प्रसिद्धीच्या झोतात आला नाही. परंतु त्याने आपल्याने युक्तीने युक्तीने सम्राट अकबरला प्रभावित केले होते. त्याविषयीची कागदपत्र उपलब्ध आहेत.

त्याच्याकडे कोणतेही काम सोपवा तो पार पाडून दाखवायचा. बादशहाने त्याच्यावर शाही खुराड्याची जबाबदारी सोपवली. आणि सांगितले. यातील कोंबड्या धष्टपुष्ट झाल्या पाहिजेत. परंतु त्यासाठी आता जो खर्च आहे. त्याच्यापेक्षेा निम्म्या खर्चात हे भागवायचे. त्याने हसत हसत हे काम स्वीकारले. मोठ्या शिफायतीने शाही खुराड्यावरील खर्च त्याने मिळालेल्या खर्चापेक्षाही कमी करून दाखवण्यासाठी जुगाड केला. आणि बादशहाच्या मनात घर केलं आणि तो नवरत्नांपैकी एक गणला जाऊ लागला. त्याचे नाव मुल्ला दो प्याजा.

मुल्ला दो प्याजाचा बालपणीचा काळ 
लहानपणी हा मुल्ला दो प्याजा खोडकर होता. त्याचं नाव अबुल हसन असं होतं आणि त्याचे वडील मोहसीन एक शिक्षक होते. या अब्दुलच्या वडिलांना आपल्या मुलास चांगले प्रशिक्षण द्यायचे होते. पण अबुलला काहीतरी वेगळंच काही तरी करायचं होतं. तो पुस्तके घेऊन तासंतास वेळ घालवत असे. मात्र, अबुल हसन नऊ वर्षांचा असतानाच आईचे निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केले. पुढे त्या नवरा-बायकोत खटके उडाले. मग अबुलही घराबाहेर पडला. फिरत फिरत तो इराणला पोहोचला. त्याच वेळी शेरशाह सुरीकडून पराभूत होऊन हुमायूनेही मदतीसाठी तेहरान गाठले. त्यावेळी हुमायूंचा सर्वात खास साथीदार योद्धा मिर्झा बख्श होता. सरदार अकबर अलीमुळे मिर्झा बख्श हेही  त्याचे जवळचे मित्र झाले.

असा आला भारतात

भारत जिंकण्याच्या उद्देशाने हुमायून इराणकडून मदत घेऊन परत येत असताना त्याने मिर्झा बख्शलाही सोबत घेतले. हुमायूच्या सैन्याने काबूल आणि अफगाणिस्तानवर आपला विजयी ध्वज फडकावला. तोपर्यंत त्याचा प्रतिस्पर्धी शेरशाह सूरी भारतात मेला होता. आणि हुमायूंसाठी आता भारताचा रस्ता स्पष्ट झाला होता. त्यानंतर अबुल हसनही आपल्या सैन्यासह भारतात आला. पण त्याचा जवळचा मित्र मिर्झा बख्श काबुलच्या युद्धात मरण पावला. अबुल हसन हुमायूनसह इराणहून भारतात आला. हुमायूने दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर तो एका मशिदीत राहू लागला. तिथेच तो इमामत (धार्मिक कार्य) करू लागला. आता सामान्य मुलगा असणारा अबुल हसन इमाम अबुल हसन झाला होता.

असा आला बादशहाच्या दरबारात

तो आपल्या आवाजामुळे प्रसिद्ध पावला. राजदरबारातील लोकही त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येत. अकबरच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या फैज फैजी याच्याशी भेट झाली. मुल्लाने त्याला घरी दावत दिली. त्याने एक खास डिश दिली. ती फैजीला खूप आवडली. पैजीने विचारले हा कोणता पदार्थ आहे. त्यावर मुल्ला म्हणाला हा आहे मुर्गा दो प्याजा. पुढे त्याची ख्याती अकबरापर्यंत गेली. बादशहानेही त्याच्या या डिशचे गुणगाण केलं. त्यामुळे मुल्लाला पाकखान्याची जबाबदारी दिली. बादशहाही त्याच्या मुर्गा दो प्याजाचा दिवाणा होता. त्याने मुर्गाएेवजी मुल्ला दो प्याजा असं टोपणनाव दिलं. परंतु मुल्ला एवढ्यावर समाधान मानणारा नव्हता. त्याला बादशहाच्या दरबारात जाऊन नवरत्नांमध्ये स्थान मिळवण्याची चाह होती.

अशी केली युक्ती

बादशहाच्या खुराड्याची तो जबाबदारी पाहत होता. अकबर जेव्हा कोंबडीखान्याचा हिशेब पाहिला तेव्हा त्याला धक्काच बसला. खर्चा निम्म्याहून घट झाली होती. मुल्लाला त्याने बोलावून घेत विचारले, हे कसं काय शक्य केलंस. त्यावर मुल्ला म्हणाला, भटारखान्यात जे अन्न शिल्लक किंवा खरकटे राहते. ते या कोंबड्यांना खायला घालतो. त्यामुळे बादशहाच्या मनात त्याने घर पक्कं केलं. कारण अकबरालाही हे जमलं नव्हतं. अकबराने त्याच्यावर शाही ग्रंथालयाची जबाबदारी सोपवली. परंतु त्याला व्हायचे होते नवरत्नांपैकी एक. मुल्ला आपले काम करीत राहिला. बादशहाने तिथेही भेट दिली. तेव्हा त्याला पुस्तके मखमली कापडाने झालेली दिसली. बादशहा अकबर आनंदून गेला. त्याने विचारले हे कसे केले. त्याने सांगितले. आपल्याला जी भेट मिळालेली मखमली कपडे आहेत, ती एकत्रित केली. ती आपल्या शाही दर्जीकडून पुस्तकाच्या मापाची शिवून घेतली. बादशहा पुस्तकांवर फार प्रेम करायचा. त्यामुळे त्याला ही कृती फार आवडली.याच घटनेने मुल्लाला राजदरबारात स्थान मिळाले. आणि तो नवरत्नांपैकी एक झाला. पुढे तो गृहमंत्री झाला.राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. परंतु याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.

मुल्ला दो प्याजा अकबरासोबत दक्खनमध्ये आला. तेव्हा त्याची तब्येत अहमदाबादमध्ये खराब होऊ लागली. हैदराबादजवळ पोहचल्यावर त्यांचा आजार वाढला. त्यातच त्याचे निधन झाले. अशा प्रकारे अबुल हसन उर्फ मुल्ला दो प्याजा नावाच्या चतुर रत्न अनंतात विलिन झाले, इतिसाचे अभ्यासक प्रा. अमोल बुचुडे यांच्याकडील दस्तएेवजातून ही माहिती समोर आली आहे.

मुल्ला नवरत्नांपैकीच

मुल्ला दो प्याजाचे रेखाचित्र अहमदनगरच्या एेतिहासिक वस्तू संग्रहालयात उपलब्ध आहे. तो ज्यावेळी दक्षिणेत आला. त्यावेळी ते कोणीतरी रेखाटले असावे. मुल्ला दो प्याजा नावाच्या नवरत्नाबद्दल अनेक एेतिहासिक पुरावे आहेत. इतिहासकार सी.एम. नईम आणि न्यू दिल्ली सोशल सायन्स प्रेसकडेही त्याच्याबाबत कागदपत्रे उपलब्ध आहेत. मुर्गा दो प्याजा नावाची डिश त्याच्यापासून प्रसिद्ध पावली. त्या डिशची रेसिपी त्याचीच आहे. व्हेज दो प्याजा नावानेही शाकाहारी डिश आहे. ती त्यापासून बनली असावी.

- प्रा. अमोल बुचुडे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर.

वस्तू संग्रहालयातील रेखाचित्र

मुल्ला दो प्याजाचे एेतिहासिक रेखाचित्र एेतिहासिक वस्तू संग्रहालयाकडे उपलब्ध आहे. ते नूतनीकरणानंतर दालनात दर्शनी भागात लावले आहे. संग्रहालयाकडे अशी छायाचित्र आहेत. त्यांविषयी अभ्यास होण्याची गरज आहे. संग्रहालयास नगर तसेच शेजारील जिल्ह्यातील राजघराण्यातील लोकांनी आपल्या जुन्या वस्तू, रेखाचित्र, पोथ्या, दस्तावेज, वंशावळी दिल्या आहेत. भांबोरकर भोसले, पळशीचे घराणे, सरदार गंधे यांच्या घराण्याचा दस्तावेज आहे. मुल्लाचे रेखाचित्रही वैयक्तिक संग्रहालयातून आले आहे.

प्रा. संतोष यादव,

अभिरक्षक, एेतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com