नगरमधील माळीवाडा, संगमनेर भाग कंटेन्मेंट झोन, असा आहे आदेश

The order is Maliwada, Sangamner part containment zone in Ahmednagar
The order is Maliwada, Sangamner part containment zone in Ahmednagar

नगर : नगर शहरातील माळीवाडा आणि संगमनेर शहरातील ठराविक भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. तेथील प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

हा आहे बफर झोन

अहमदनगर शहरातील फुलसौंदर चौक माळीवाडा - पंचपीर चावडी - जुना बाजार रोड - मदवाशाह पीर - बारातोटी कारंजा - इवळे गल्‍ली चौक - वरवंडे गल्‍ली - सौभाग्‍य सदन - विळदकर गल्‍ली - पारगल्‍ली - विशाल गणपती मंदिर उत्‍तर बाजु - आशा प्रोव्‍हीजन स्‍टोअर्स - फुलसौंदर चौक हा भाग कन्टेंमेट झोन तर संत कैकाडी महाराज व्‍यापारी संकुल - बगदादी खानावळ - खाटीक गल्‍ली - सवेरा हॉटेल - नागरे गल्‍ली - माणकेश्‍वर गल्‍ली - भिस्‍त गल्‍ली - शेरकर गल्‍ली - गोंधळे गल्‍ली - इवळे गल्‍ली - कौठीची तालीम - दवकर गल्‍ली - अमन पाटील रोड - माळीवाडा वेस - भोपळे गल्‍ली - संत कैकाडी महाराज संकुल हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

१७जूनपर्यंत आदेश

आजपासून या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्या १७ जून २०२० रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या कालावधीत कन्टेन्मेंट झोनमधील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ. आणि बफर झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इत्यादी बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. त्याअन्वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड-19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नगर शहरातील माळीवाडा परिसरात कोरोना विषाणू लागण झालेल्या व्यक्ती आढळून आल्याने संसर्ग रोखण्यासाठी हा परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आला आहे. सार्वजनिक ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे हा आदेश उद्घोषित करण्‍यात यावा. कंट्रोल रुम स्‍थापन करुन 24 x 7  कार्यरत ठेवावी. सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्‍यात येवून प्रत्‍येक शिफ्टमध्‍ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्‍द करण्‍यात यावेत.

शासनाने हे करावे

अहमदनगर शहरातील या भागासाठी आयुक्‍त, महानगरपालीका, अहमदनगर सनियंत्रण अधिकारी म्‍हणून कामकाज पाहतील.या क्षेत्रामध्‍ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत. संत कैकाडी महाराज व्‍यापारी संकुलाकडून फुलसौंदर चौकाकडे येणारा रस्‍ता हा येण्याजाण्याचा मार्ग निर्धारित करण्यात आला आहे. या ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवा व जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतुक व वितरण व्‍यवस्‍थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्‍यात यावा. ये-जा करणा-या व्यक्तींची थर्मल स्‍कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्‍यात यावी.

कंट्रोल रुममध्ये रजिस्ट ठेवून त्‍यामध्‍ये नोंदी घेण्यात याव्यात. दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्‍यादी बाबी योग्‍य ते शुल्‍क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात.  

संगमनेरमधील मोना प्लॉट, वाबळे वस्ती कन्टेन्टमेंट

संगमनेर शहरातील मोना प्लॉट आणि वाबळे वस्ती हा भाग कन्टेंनमेंट झोन तर कोल्हेवाडी रस्ता बफर झोन म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून या भागात आजपासून ते 17 जून रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. तसेच कन्टेनमेंट झोन क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा, इतर आस्थापना बंद राहणार असून नागरिकांच्या येण्याजाण्यावरही प्रतिबंध करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com