
शिर्डी : आयपीएल स्पर्धेत उद्या होत असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला यश मिळावे, यासाठी उद्योजक आकाश अंबानी यांनी आज साईबाबांच्या समाधीवर चादर चढवली. स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्यांनी येथे येत साईबाबांची प्रार्थना केली. आयपीएल सुरू झाल्यापासून त्यांची ही तिसरी शिर्डी भेट होती.