esakal | मुंबईच्या पोलिस अधिकाऱ्याला श्रीगोंद्यात अटक...मंत्रालयातून यायचे फोन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai police officer arrested at Shrigonda

थिटे सांगवी येथे अमिता हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेनंतर तिच्या वडिलांनी फिर्याद देत तिची आत्महत्या पती पाडूंरंग देवकाते यांच्या लफडेखोरीला कंटाळून झाली अाहे.

मुंबईच्या पोलिस अधिकाऱ्याला श्रीगोंद्यात अटक...मंत्रालयातून यायचे फोन

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : थिटे सांगवी (ता. श्रीगोंदे) येथे अमिता देवकाते या विवाहित महिलेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. अमिताचा पती पाडूंरंग देवकाते हा वाशी (मुंबई) येथे सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याने खळबळ उडली होती.

पती लफडेखोर असल्यानेच ही आत्महत्या झाल्याची फिर्याद दाखल झाली. या घटनेत त्या पोलिस अधिकाऱ्याला अटक का होत नाही याची विचारणा करण्यासाठी थेट मंत्रालयातून श्रीगोंदे पोलिसांना फोन येत होते. शेवटी पोलिसांनी इतर दोघांना अटक करीत त्या अधिकाऱ्याचे तोंड दाबले आणि तो स्वत:हून हजर झाला. 

थिटे सांगवी येथे अमिता हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेनंतर तिच्या वडिलांनी फिर्याद देत तिची आत्महत्या पती पाडूंरंग देवकाते यांच्या लफडेखोरीला कंटाळून झाली अाहे. यात तिचे सासू, सासरा व दीरही सहभागी आहेत. या सर्वांनी अमिताला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला.

हेही वाचा - शिवबंधन बांधताच नेवाशात उमटली ही प्रतिक्रिया

श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील धाडसी सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांच्याकडे प्रकरणाचा तपास आला. त्यांनी सगळी माहिती काढल्यावर त्या पोलिस अधिकाऱ्याचे प्रकरण पुढे आले. फिर्याद खरी असून अमिता हिला त्रास होत असल्यानेच तिने जीवन संपवल्याचे पुरावे समोर आल्याने गावित यांनी हे प्रकरण धसास लावण्याचा चंग बांधला.

मुख्य आरोपी हाही पोलिस अधिकारी असल्याने सापडत नव्हता. सगळे मोबाईल स्विच-ऑफ करुन अज्ञातस्थळी जावून लपले होता. गावित यांच्या पथकाने बीड जिल्ह्यासह हडपसर येथून दोन नातेवाईक उचलले. त्यांच्याकडून थोडी माहिती मिळाली. मात्र, त्याचा उपयोग होत नव्हता. त्यातच आरोपी अटक होत नसल्याने वरिष्ठांचा पाठपुरावा सुरु होता. 

श्रीगोंदे पोलिसांना थेट मंत्रालयातून फोन सुरु झाले होते. रोजच्या रोज मंत्रालयातून आढावा घेणारे फोन येत असल्याने श्रीगोंदे पोलिस कमालीचे टेन्शनमध्ये होते.
एक दिवशी तो पोलिस अधिकारी हजर होतोय असा निरोप आला आणि पोलिस त्याच्या स्वागताची तयारी करीत होते.

तो श्रीगोंद्यात आला. मात्र पोलिसांना गुंगारा देवून पळून गेला. वैतागलेल्या पोलिसांना खबर मिळाली आणि मयत अमिता हिचा सासरा ज्ञानदेव देवकाते व दीर गणेश यांना हडपसर येथून एका भाडोत्री घरातून उचलले. हे दोघे हाती लागल्यावर मुख्य आरोपी पाडुंरग धावतच काल (सोमवारी) श्रीगोंदे पोलिसात हजर झाला. त्यामुळे पोलिसांनी मात्र सुस्कारा सोडला. 
 

संपादन - अशोक निंबाळकर