esakal | सभागृह नेता पुन्हा सावेडीचाच, विकासाचं काय?

बोलून बातमी शोधा

Municipal assembly leader Sawedi again

महापौर बाबासाहेब वाकळे हे सावेडीतीलच आहेत. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधेही सावेडीचेच. भाजपने नियुक्ती दिलेले तीनही सभागृह नेते सावेडी उपनगरातीलच आहेत.

सभागृह नेता पुन्हा सावेडीचाच, विकासाचं काय?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः महापालिकेतील सभागृह नेता महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुन्हा बदलला आहे. काल रवींद्र बारस्कर यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मागील सव्वादोन वर्षांच्या कार्यकाळात महापौर वाकळे यांनी महापालिकेला तीन सभागृह नेते दिले. मात्र हे तिघेही सावेडीतीलच आहेत. 

महापौर बाबासाहेब वाकळे हे सावेडीतीलच आहेत. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधेही सावेडीचेच. भाजपने नियुक्ती दिलेले तीनही सभागृह नेते सावेडी उपनगरातीलच आहेत. यात स्वप्नील शिंदे, मनोज दुलम व आता रवींद्र बारस्कर यांचा समावेश आहे. स्थायी समितीत भाजपने दोन सदस्य पाठविले. तेही सावेडीतीलच आहेत. हे दोन्ही सदस्य महापौरांच्या प्रभागातीलच आहेत. त्यात रवींद्र बारस्कर यांचा समावेश आहे. 

महापालिकेच्या सभागृह नेतेपद नियुक्‍तीचे पत्र नगरसेवक रवींद्र बारस्कर यांना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले. यावेळी सभागृह नेते मनोज दुलम, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके, नगरसेवक कुमार वाकळे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

 गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील मूलभूत प्रश्‍नांबरोबर विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. भाजप शहर विकासाचा अजेंडा तयार करून काम करीत आहे. भाजपच्या नगरसेवकांना पदाच्या माध्यमातून विकासकामांसाठी संधी मिळावी म्हणून सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. 
- महापौर बाबासाहेब वाकळे 

 
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भाजपच्या माध्यमातून सभागृह नेतेपदाची मला संधी दिली. या पदाच्या माध्यमातून नगर शहरातील विकासाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विकासाच्या प्रश्‍नांबरोबर भाजपची ध्येय्य धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे. शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सभागृहातील सर्व पक्षीय नगरसेवकांना बरोबर घेवू. 
- रवींद्र बारस्कर, सभागृह नेते, महापालिका, नगर.