Ahmednagar News :आपत्काळात मोबाईल बंद करू नका ; डॉ. पंकज जावळे

धोकादायक इमारत मालकांना नोटिसा द्याव्यात, अग्निशमन विभागाने फायर ऑडिट व इलेक्ट्रिक इन्स्पेक्शन करून घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
Ahmednagar Municipal Corporation Meeting
Ahmednagar Municipal Corporation MeetingSakal

Ahmednagar News : पावसाळा तोंडावर आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने सुटीवर जाऊ नये, तसेच आपला मोबाईल फोन बंद करू नये. नागरिकांना आपत्कालीन मदत तत्काळ मिळायला हवी, अशा सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या.

महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक व आपत्ती व्यवस्थापन याबाबत विविध उपाययोजना करण्यासंदर्भात डॉ. जावळे यांनी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंढे, लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार,

शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, श्रीकांत निंबाळकर, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, शंकर मिसाळ, शशिकांत नजान, नाना गोसावी, राम चारठाणकर आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणारी ठिकाणे शोधून काढा. त्या ठिकाणचा कचरा, प्लास्टिक व इतर साहित्य हटवावे, तसेच पाईपांच्या अग्रभागी असणारे मटेरियल हटवून प्रवाह मोकळा करा.

घनकचरा विभागामार्फत छोट्या नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करावे, पाणीपुरवठा विभागामार्फत पाईपलाईनचे लिकेजेस काढावेत, पाणी शुध्दीकरणासाठी आवश्यक तो क्लोरीन साठा, ब्लिचिंग साठा तयार ठेवावा. नागरी हिवताप योजनेमार्फत पाणी साठणारी ठिकाणे, तसेच डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी औषध फवारणी करावी, नागरी भागात धूर फवारणीचे नियोजन करावे, अशा सूचना डॉ. जावळे यांनी दिल्या.

धोकादायक इमारत मालकांना नोटिसा

बाह्य यंत्रणेमार्फत कर्मचारी उपलब्ध करावेत, आवश्यक औषधसाठा आरोग्य केंद्रामध्ये ठेवावा. डेंगीसदृश आजारांबाबत जनजागृती करावी, कचऱ्याचे ढीग तत्काळ उचलण्याची कार्यवाही करावी. चेंबरच्या झाकणांची यादी बांधकाम विभागाला द्यावी. सीना नदी काठी आवश्यक तेथे बॅरिकेड, बॅनर, फ्लेक्स लावावेत. धोकादायक इमारत मालकांना नोटिसा द्याव्यात, अग्निशमन विभागाने फायर ऑडिट व इलेक्ट्रिक इन्स्पेक्शन करून घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

प्रमुख उपाययोजना

  • आरोग्य केंद्रात औषधसाठा

  • आपत्कालीन कक्ष २४ तास कार्यरत

  • चार झोनसाठी डी-वॉटरिंग पंप

  • कर्मचाऱ्यांनी विनापरवाना गैरहजर राहू नये

  • झाडांच्या फांद्या हटविणार

  • पाण्याच्या पाईपलाईनचे लिकेज काढणे

  • औषध व धूर फवारणी करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com