Ahmednagar News : जावळे पळाले, पवार नको म्‍हणाले अन् शेवटी यशवंत डांगे आले!

Ahmednagar News : महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यावर आठ लाख रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
Dr. Pankaj Javale
Dr. Pankaj Javalesakal
Updated on

अहमदनगर - महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे लाचेच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या जागी अमरावतीचे सहायक आयुक्त देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु चोवीस तासात पवार यांची नियुक्ती रद्द करून पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांच्या नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत. त्यामुळे जावळे गेले, पवार नको म्हटले अन् पुन्हा डांगे आले, असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यावर आठ लाख रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण? याची उत्सुकता नगरकरांना होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला. दरम्यान, आयुक्तपदी अमरावतीचे सह आयुक्त देवीदास पवार यांची नियुक्ती केल्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने काढले होते. परंतु आदेश काढून चोवीस तास उलटले नाहीत, तोच पवार यांची नियुक्ती रद्द करून पिंंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे आदेश नगरविकास विभागाने बुधवारी (ता.१०) काढले आहेत.

Dr. Pankaj Javale
Mechanical Boat : यांत्रिक बोट ‘गाळात’, खर्च ‘पाण्यात’; ४० लाखांचा खर्च, बोट मात्र सुरू होईना

दरम्यान डांगे यांनी यापूर्वी नगर महापालिकेत दोन वर्ष उपायुक्त पदावर काम केलेले आहे. त्यांचा हा अनुभव कामी येणार आहे. परंतु अचानक पवार यांची नियुक्ती रद्द करून डांगे यांच्या नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने काढल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता डांगे कधी पदभार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dr. Pankaj Javale
Leopard Attack : आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत बिबट्याने चिमुरडीला उचलून नेत ठार मारले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.