कार्यकर्त्यांच्या गळ्यात गुरूवारी पडणार स्वीकृतची माळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Corporation meeting for elections on Thursday

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन दीड वर्ष झाले. सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्‍त पदभार असताना स्वीकृतसाठी सभा बोलावण्यात आली.

कार्यकर्त्यांच्या गळ्यात गुरूवारी पडणार स्वीकृतची माळ

नगर ः महापालिकेत स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीची रणधुमाळी थांबते ना तोच स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीसाठी गुरवारी(ता.1) सभा बोलाविण्यात आली.

यापूर्वीही एकदा स्वीकृत नगरसेवकपद निवडीसाठी सभा बोलावण्यात आली होती. मात्र, नगरसेवकपदासाठी गटनेत्यांनी सुचविलेल्या नावांचे अर्ज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बाद ठरविले होते. त्यामुळे आता पुन्हा स्वीकृतपदासाठी सभा बोलावली आहे. 

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन दीड वर्ष झाले. सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्‍त पदभार असताना स्वीकृतसाठी सभा बोलावण्यात आली.

त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वर्गीय बाबासाहेब गाडळकर व माजी नगरसेवक विपूल शेटिया, शिवसेनेने संग्राम शेळके व मदन आढाव यांचा तर भाजपने रामदास आंधळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावांची छाननी करत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी पाचही अर्ज नाकारले. 

मार्च महिन्यात श्रीकांत मायकलवार यांनी आयुक्‍तपदाचा पदभार घेतला. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे राज्य सरकारने निवडीच्या सभा व निवडणुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने निवडी करण्यास मान्यता दिल्यानंतर स्थायी समितीतील सदस्य निवड व सभापतिपदाची निवड झाली.

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आता गुरुवारी (ता. 1 ऑक्‍टोबर) स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी महापालिकेची विशेष सभा बोलावली आहे. 
संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top