महापालिका करणार करवसुलीसाठी सक्ती: जप्ती, वॉरंट अन्‌ लिलावही करणार! | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका करणार करवसुलीसाठी सक्ती:  जप्ती, वॉरंट अन्‌ लिलावही करणार!
महापालिका करणार करवसुलीसाठी सक्ती: जप्ती, वॉरंट अन्‌ लिलावही करणार!

महापालिका करणार करवसुलीसाठी सक्ती: जप्ती, वॉरंट अन्‌ लिलावही करणार!

अहमदनगर : मार्च एण्ड जवळ आला, तसा महापालिकेला (ahmednagar carporation)वसुलीचे वेध लागले आहेत. नऊ महिन्यात विविध कारणांनी वसुलीचे प्रमाण केवळ १६.९८ टक्के आहे. मागणी २२३.३२ कोटींची आहे. वसुली मात्र केवळ ३७.४१ कोटी झाली आहे. वसुलीवरच महापालिकेचे इतर खर्च अवलंबून असल्याने आता जप्ती,(Confiscation) वॉरंट(warrent) अन लिलावाचा फंडा वापरण्यात येत आहे. एव्हढेच नव्हे, तर चौकाचौकात मोठ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलकही लावण्याचे नियोजन होत आहे. महापालिकेचे बहुतेक खर्च घरपट्टी(prpperty tax), पाणीपट्टी(water tax), प्लाटवरील कर अशा रकमेंवर अवलंबून असतात. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या पगार देण्याचीही अडचण होते. सफाई कर्मचारी पगारासाठी कायम आंदोलन करतात. विकास कामांसाठी निधी कमी पडतो. प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळे प्रयोग होत असतात. मागील वर्षी शास्ती माफी दिली होती; परंतु वसुली हव्या त्या प्रमाणात झालीच नाही.

हेही वाचा: कोपरगावसाठी १२३ कोटी रुपयांच्या पाणी योजनेस मान्यता : आमदार आशुतोष काळेंची वचनपूर्ती

अशी करणार कारवाई

  1. चौकात थकबाकीदारांच्या नावाचे फ्लेक्स लावणार

  2. प्रभागनिहाय कर्मचारी नियुक्त

  3. धनादेश, रोख, डिजिटल स्वरुपात रक्कम स्विकारणार

  4. तगादा रजिस्टर तयार

हेही वाचा: अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनाही कोरोना लसीची मात्रा

प्लाॅटधारकांवर बडगा

शहरात बहुतेक उपनगरांत गुंतवणूक म्हणून प्लाट घेण्यात आलेले आहेत. त्यावर बांधकामे नसली, तरीही त्यांच्याकरडून कर येणे असते. संबंधित प्लाटधारक नियमित कर भरत नाहीत. थेट खरेदी-विक्रीच्या वेळी ही रक्कम भरली जाते. व्यवहार झाल्यानंतर महापालिकेकडे नाव नोंदणी होत नाही. त्यामुळे नेमका मालक कोण, हे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे वसुलीस अडचण येते.

आकडे बोलतात

  1. मागील थकबाकी - १७६.६२

  2. ४३ चालू थकबाकी - २२३.३२

  3. एकूण थकबाकी -१६.४८

  4. मागील बाकी जमा -२०.९३

  5. चालू कर जमा -१६.९८ टक्के

हेही वाचा: सावित्रीच्या लेकींची आजही शिक्षणासाठी परवड...

पुढील तीन महिन्यांत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी दुकाने सीलही करण्यात आली आहेत. नागरिकांनी करांची थकबाकी भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे व कारवाई टाळावी.

- सुनील चाफे, सहाय्यक करमूल्य निर्धारक, महापालिका

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top