esakal | महापालिकेने नागरिकांकडून घेतला साडेतीन लाखांचा दंड 
sakal

बोलून बातमी शोधा

amc nagar

या कारवाईत 201 जणांना दंड केला तर एक व्यक्‍तीवर गुन्हा दाखल केला. या कारवाईतून 2 लाख 86 हजार 400 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 18) 12 हजार रुपये तर रविवारी सायंकाळपर्यंत 52 हजार 700 रुपयांचा दंड केला आहे.

महापालिकेने नागरिकांकडून घेतला साडेतीन लाखांचा दंड 

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : शहरात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी दक्षता पथक तयार केले आहे. या पथकाने 17 दिवसांत 74 व्यक्‍तींना दंड करत तीन लाख 51 हजार 100 रुपये दंड वसूल केला आहे. 

अवश्‍य वाचा - तारकपूर, सूर्यनगर कंटेन्मेंट झोन 

दक्षता पथकाने 3 ते 17 जुलै या कालावधीत संपूर्ण शहर, बाजारपेठ, भाजी बाजार, उपनगरांत नेमून दिलेल्या वेळेपूर्वी दुकान उघडण्या बद्दल, वेळ नंतर दुकान चालू ठेवल्या बद्दल, सोशल डिस्टन्स न पाळल्या बद्दल व मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईत 201 जणांना दंड केला तर एक व्यक्‍तीवर गुन्हा दाखल केला. या कारवाईतून 2 लाख 86 हजार 400 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 18) 12 हजार रुपये तर रविवारी सायंकाळपर्यंत 52 हजार 700 रुपयांचा दंड केला आहे. 

या दक्षता पथकात महापालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान, यंत्र अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी डॉ. नरसिंग पैठणकर, स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेंद्र सामल, बाळासाहेब विधाते, विजय बोधे,गणेश लायचेट्टी, सूर्यभान देवघडे ,राहुल साबळे, बाळासाहेब पवार, राजेश आनंद, रवींद्र सोनावणे, किशोर जाधव, भास्कर अकुबत्तीन, पोलीस कॉ. श्रीकांत खताडे, पो.कॉ. शरद गांगर्डे, पो.कॉ. ए.टी.वामन, पो.कॉ. जे.एल.लहारे, पो.कॉ.महादेव निमसे, पो.कॉ. नितीन फुलारी आदींसह महापालिका व पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 


पोलिस उपअधीक्षकांचे मार्गदर्शन 
पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी महापालिकेच्या कोरोना विषयक दक्षता पथकाची काल (शनिवारी) बैठक घेतली. या बैठकीत पथकाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानुसार आज या पथकाने सायंकाळपर्यंत नागरिकांना 52 हजार 700 रुपयांचा दंड केला आहे.

loading image