esakal | तारकपूर, सूर्यनगर कंटेन्मेंट झोन 
sakal

बोलून बातमी शोधा

amc nagar

शहरातील तारकपूर व सूर्यनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हे दोन्ही परिसर कंटेन्मेंट झोन केले आहेत.

तारकपूर, सूर्यनगर कंटेन्मेंट झोन 

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : शहरातील तारकपूर व सूर्यनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हे दोन्ही परिसर कंटेन्मेंट झोन केले आहेत. हा परिसर 30 जुलैच्या दुपारी दोन वाजेपर्यंत कंटेन्मेंट झोन राहील. या परिसरात महापालिकेकडून जीवनावश्‍यक वस्तू सशुल्क पुरविण्यात येणार आहेत. 

अवश्‍य वाचा - महापालिकेची स्थायी समिती सभा होणार ऑनलाईन 

सूर्यनगरमधील वेदांत सहकारी गृहनिर्माण संस्था, जोशी यांचे घर, इथापे घर, सोनवणे घर, सीमा बंगला, महादेव मंदिर, संत वामनभाऊ सार्वजनिक वाचनालय, खुली जागा ते जोशी यांचे घर हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे, तर पूर्वेस सूर्यनगर वसाहत, गिते वस्ती, दक्षिणेस वेदांत सहकारी गृहनिर्माण संस्था व अभियंता कॉलनी परिसर, पश्‍चिमेस एसटी कॉलनी व लक्ष्मीनगर वसाहत, उत्तरेस सूर्यनगर वसाहत व तपोवन रस्ता हा परिसर बफर झोन करण्यात आला आहे. 

तारकपूर परिसरातील राधास्वामी सत्संग भवन, साळवे घर, लुल्ला घर, गोरवारा घर, पंजाबी हॉल, कुमार कॉर्नर, सच संताराम धाम, भालेराव घर, राधास्वामी सत्संग भवन परिसर कंटेन्मेंट झोन झाला आहे, तर प्रकाशपूर वसाहत, इंदिरा कॉलनी, तारकपूर वसाहत, नगर-मनमाड रस्ता, तारकपूर रस्ता, स्वामी विवेकानंद शाळा परिसर बफर झोन केला आहे. या परिसराला आज महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार व शहर अभियंता सुरेश इथापे यांनी भेट देऊन पाहणी केली. कंटेन्मेंट झोन परिसर पत्रे लावून "सील' करण्यात आला आहे.