महापालिका करणार बूथ हॉस्पिटलची दुरूस्ती

अमित आवारी
Saturday, 10 October 2020

बुथ हॉस्पिटल हे नगर जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर आहे. हे हॉस्पिटल धर्मादाय आहे. या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्याची दुरूस्ती महापालिकेने करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. एकीकडे महापालिकेचे बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्रे अंतिम घटका मोजत आहेत.

अहमदनगर : महापालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता. पाच) दुपारी एक वाजता होणार आहे. शहरातील सॅव्हलिन आर्मीचे ईव्हॅन्जलिन बुथ हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्याची अत्यावश्‍यक दुरूस्ती महापालिका करून देणार आहे.

या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेसमोर मांडण्यात येणार आहे. या शिवाय अन्य दहा विषयांवरही सभेत चर्चा होणार आहे.

बुथ हॉस्पिटल हे नगर जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर आहे. हे हॉस्पिटल धर्मादाय आहे. या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्याची दुरूस्ती महापालिकेने करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. एकीकडे महापालिकेचे बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्रे अंतिम घटका मोजत आहेत.

एमआरआय सेंटरसाठी महापालिकेला जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने यापूर्वी नटराज हॉटेल, शासकीय तंत्रनिकेतन आदी ठिकाणच्या कोविड सेंटरसाठी भरीव निधी खर्च केला आहे. ही ठिकाणे महापालिकेच्या मालकीची नाहीत अशा स्थितीत महापालिकेने बुथ हॉस्पिटलसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने महापालिकेत आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. शहरातील पथदिवे बंद असल्याबाबत सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार शहरातील पथदिवे दुरूस्तीचे साहित्य खरेदी व देखभालीचा विषय स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. या दोन विषयांसह अन्य दहा विषयही महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चिले जाणार आहेत. नेर

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation will repair Booth Hospital