घनकचरा ठेकेदाराविरुद्ध कारवाईसाठी नगरपालिकेचे पोलिसांना निवेदन

Municipal police statement for action against solid waste contractor
Municipal police statement for action against solid waste contractor

श्रीरामपूर (अहमदनगर) : नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत चांदवड (जि. नाशिक) येथील सुधर्म एन्व्हायरोमेंट सोल्युशन कंपनीचे व्यवस्थापक गणेश ठाकरे यांच्याविरुध्द पोलिस कारवाई करण्याची मागणी नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक संजय आरणे यांनी केली आहे.

यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने शहर पोलिस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेवून ठेकेदाराविरुद्ध कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. सुधर्म एन्व्हायरोमेंट सोल्युशन खासगी कंपनीने नगरपालिकेकडून घनकचरा कामांचा ठेका घेतला आहे. त्यानुसार ठेकेदाराने १६//२०२० पासून शहर साफसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ केला. कामांच्या आदेशाप्रमाणे टेंडर फॉर्म मधील अटी आणि शर्ती नुसार, तसेच करारनाम्यामधील अटी आणि शर्ती नुसार सदर ठेकेदाराने स्वच्छतेचे काम दैनंदिन आणि नियमितपणे करणे गरजेचे आहे.
 

शहरातील घर ते घर कचरा संकलन, झाडलोट सफाई, गटार सफाई, सार्वजनिक शौचालय सफाई, मुतारी सफाई, मृत-जनांवरे उचलणे, ओल्या कचरयावर प्रक्रिया करणे, उघड्यावरील कचरा संकलन करणे, स्लॉट मधील दैनंदिन कचरा संकलन करण्याच्या कामांचे निविदेत नमूद केल्याप्रमाणे प्रतिमाह २५ लाख ३६ हजार रक्कमेप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या कडून १४ व्या वित्त आयोगाातुन प्राप्त निधीत एका वर्षासाठी शहर स्वच्छ करणे ठेकेराला बंधनकारक आहे. तसा २३/०६/२०२० च्या विशेष सभेत ठेक्याचा ठराव केला आहे. नगरपालिका आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या करारनाम्यातील अटीनुसार ठेकेदाराने १६/०७/२०२० ते १५/०७/२०२१ कालावधीच्या मुदतीच्या पुर्व कोणत्याही प्रकारची माहिती न देता मध्येच काम सोडुन पळ काढला. त्यामुळे संबधीत ठेकेदारावर नगरपालिकेमार्फत फौजदारी गुन्हा दाखल करुन कायदेशीर कार्यवाही करावी.
 

तसेच सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी पालिकेने पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. दरम्यान, ठेकेदाराचे मुख्य सुपरवायझर बुधवारी (ता. ११) मध्यरात्री शहरातून परस्पर निघुन गेले. त्यामुळे शहरातील कचरा संकलनाचे काम बंद झाले. ऐन दिवाळीच्या काळात ठेकेदाराने स्वच्छतेच्या कामात अडचणी निर्माण केल्याने आणि करारनाम्यातील अटी आणि शर्तीचा भंग केला. नागरिकांसह व्यापारी वर्गाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबधीत ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक ठाकरे याच्यावर कडक कारवाईची मागणी आरणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 
नगरपालिका आणि संबधीत ठेकेदाराच्या प्रकरणाचा पोलिस प्रशासन आढावा घेत आहे. घनकचरा ठेक्याप्रकरणी अधिक माहिती जाणून घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. या संदर्भात नगरपालिकेच्या संबधीत विभागाकडुन आज पोलिस प्रशासनाला निवेदन मिळाले असून आढावा घेवून पोलिस संबधीतावर कारवाई करणार आहे.
-
प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक- आयुष नोपाणी, श्रीरामपूर शहर, पोलिस ठाणे


संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com