

Naigaon Dhumschakri Case Takes Grim Turn as Missing Youth Found Dead
Sakal
श्रीरामपूर : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून नायगाव (ता.श्रीरामपूर) शिवारात रविवारी दुपारी दोन गटांत धुमश्चक्री झाली. हातात गावठी कट्टे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने खरेदीदारांना बेदम मारहाण केली. यावेळी जीव वाचवताना नीलेश एकनाथ शेंडगे (रा. नेवासे) या तरुणाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांच्या शोधानंतर आज (ता. १३) नीलेशचा मृतदेह हाती लागल्याने या घटनेला आता गंभीर वळण मिळाले आहे. याप्रकरणी नवनिर्वाचित नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.