Ahmednagar College Violence: आमच्याकडे वाकड्या नजरेने का पाहतो? असे म्हणत त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच एकाने त्याला खाली पाडून त्याच्या छातीवर बसत त्याचा गळा आवळला. एकाने हातातील धातूच्या कड्याने गळ्यावर व मानेवर जबर मारहाण केली.
अहिल्यानगर: शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय तरुणावर त्याच्याच वर्गातील तरुणांच्या टोळक्याने खुनी हल्ला केला. महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी (ता.२९) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.