मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण हवे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 December 2020

मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनचे समन्वयक वहाब सय्यद व कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज खान यांच्या शिष्टमंडळाने मंत्री वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

नगर ः मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती अतिमागास झाली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये द्यावे, अशी मागणी मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनतर्फे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 

मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनचे समन्वयक वहाब सय्यद व कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज खान यांच्या शिष्टमंडळाने मंत्री वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, की मुस्लिम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे, 2020 पासून पुढे होणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थामधील प्रवेशामध्ये दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला देण्यात याव्यात, 2020 पासून पुढे होणाऱ्या सर्व नोकरी मध्ये दहा जागा मुस्लिम समाजास सोडाव्यात देण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Muslim community wants ten percent reservation