esakal | तुम्हाला कर्जमाफी हवी असेल तर हे करावे लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

This is a must have, for any Affiliate, promoting any program

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत शेतक-यांचे रक्कम २ लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येत आहे.

तुम्हाला कर्जमाफी हवी असेल तर हे करावे लागणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर  : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 3 हजार ६०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे. त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन १० ऑगस्ट,२०२० पर्यंत ते करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत शेतक-यांचे रक्कम २ लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेमध्ये अहमदनगर जिल्हयातील २ लाख ८९ हजार ५७० शेतकरी पात्र ठरले अाहेत. त्यापैकी २ लाख ८५ हजार ९६८ शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना गायींसाठी मिळणार दीड लाखांचे कर्ज

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आली अाहे. त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. तथापि अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. अहमदनगर यांचे बँकेचे १५५३ खात्यांचे तर इतर बँकेचे २०४९ खात्यांचे अशा एकूण ३६०२ खात्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे या शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आला नाही.

या उर्वरित शेतक-यांनी विहित वेळेत आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा. आधार प्रमाणीकरण करतेवेळी ज्या शेतक-यांची तक्रार तालुकास्तरीय समितीकडे असेल, त्या शेतक-यांनी आपले आधार प्रमाणीकरण तक्रार पावती घेऊन संबंधित तालुका तहसील कार्यालय किंवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेशी दिनांक १० ऑगस्ट,२०२० पर्यंत आवश्यक ते कागदपत्रे घेऊन आपल्या तक्रारींचे निराकरण करुन घ्यावे, असे आहेर यांनी कळवले आहे. 

- संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top