गुड न्यूज! नगर जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या ३४० रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज

दौलत झावरे
Monday, 27 July 2020

जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सहापासून सोमवारी (ता. २७) दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १२०६ इतकी झाली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सहापासून सोमवारी (ता. २७) दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १२०६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत ९७ जणबाधित आढळून आले.

यामध्ये श्रीगोंदा (8), काष्टी (6), बनपिंप्री (1), श्रीगोंदा (1), अकोले (12), गोडेवाडी (2), रेडी (1), मनिकोझर (9), अहमदनगर (14) : अहमदनगर (1), पोलिस हेड कॉर्टर (1), सारसनगर (1), शिवाजीनगर (1), किंग रोड (1), श्रमीकनगर (1), मार्केट यार्ड कर्पे मळा (1), कानडे मळा (1), जगताप मळा (1), पाईपलाईन रोड (1),  हातमपुरा (4). नगर ग्रामीण(05) : अकोलनेर (1) इमामपुर (1), कामरगाव (1), चिंचोडी पाटील (2), राहुरी (4), बाभूळलोन (1), बारागाव नांदूर (3), पाथर्डी (1), पाथर्डी (1), शेवगाव (2), म्हसोबा नगर (1), आंतरवली खने (1), राहाता (1), राहाता (1), संगमनेर (30), मंगळापूर (1), जनता नगर (4), जोर्वे (4), निमगाव पेंढि (1), निमगाव टेम्भी (1), मालदाड रोड (4), सुकेवाडी (1), खंडोबा गल्ली (1), घोडकर गल्ली (1), नांदुरी (2), घुलेवाडी (3), माहुली (1), नांदूरखंदरमाळ (1), जेधे कॉलनी (2), पंचायत समिती (3), भिंगार (19), सदर बजार (1), सोनसेल गल्ली (3), पंचशील नगर (3), मोनिन गल्ली (3), डॉ. जयस्वाल (1), नेहरू कॉलनी (6), भिंगार खालेवाडी (1), भिंगार (1), पारनेर (1), टाकळी ढोकेश्वर (1).
दरम्यान, आज जिल्ह्यातील ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२२,
संगमनेर ३१, राहाता १८, पाथर्डी २, नगर ग्रामीण १८, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ७, नेवासा २, श्रीगोंदा ५, पारनेर ९, अकोले १, राहुरी ९, शेवगाव ४, कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे.

उपचार सुरू असलेले रुग्ण : १२०६
बरे झालेले रुग्ण : २२८५
मृत्यू : ५३
एकूण रुग्ण संख्या :३५४४

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar district 340 patients recovered from Corona were discharged today