संगमनेरमधून कोरोना बाहेर येईना... 

दौलत झावरे
Sunday, 26 July 2020

कोरोनाबाधितांचा आकडा मागील आठवड्यात वाढत चालल्याने नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली होती. 

नगर : कोरोनाबाधितांचा आकडा मागील आठवड्यात वाढत चालल्याने नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली होती. जसे रुग्ण वाढत आहे तसेच रुग्ण बरे होऊन घरी जात असल्यामुळे सर्वांना दिसाला मिळालेला आहे. आज रविवारी 465 जण बरे होऊन घरी परतल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. दुपारी 12 वाजता आलेल्या अहवालात मात्र 64 जण बाधीत आढळून आलेले त्यात सर्वाधिक संगमनेर तालुक्‍यातील आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याला काही अंशी यश येत असले तरी सर्वांना नियमांचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत. 
जिल्ह्यातील 465 जण बरे होऊन घरी गेल्याने सर्वांना दिलाला मिळालेला आहे. आतापर्यंत 1945 जण बरे झालेले आहेत. दुपारी बारा वाजताच्या अहवालामध्ये एकूण 64 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्णांची संख्या 3132 एव्हढी झालेली असून त्यातील 1136 जणांवर उपचार सुरु असून 1945 जणांना घरी सोडण्यात आलेले असून 51 जणांचा मृत्यू झालेला आहे. 
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 64 जण बाधित पुढील प्रमाणे ः अहमदनगर (2), अहमदनगर (1), फकिरवाडा (1), संगमनेर (36), पदमानगर (4), बाजारपेठ (2), जनता नगर (2), जेढे कॉलनी(3), संगमनेर (3), विद्यानगर (2), बडोदा बॅंक (3), राजापूर (2), कोंची (1), पिंपळगाव देपा (1), सुकेवाडी (3), शिबलापूर (1), गणेशनगर (3), कुरण (1), मुटकुळे हॉस्पिटल (1), खंडोबा गल्ली(2), गुंजाळवाडी (1), जवळे कडलग (1), कर्जत(10), - राशीन(4), मिरजगाव(3), कर्जत (2), पिंपळवाडी (1), राहाता (12) - शिर्डी (10), नांदुरखी (1), गोगलगाव (1), राहुरी (4)- राहुरी बुद्रुक (1), येवले आखाडा (1), वांबोरी (1), कात्रड (1). 
रुग्णालयातून घरी परतलेले पुढील प्रमाणे ः महापालिका 279, संगमनेर 33, राहाता ः 29, पाथर्डी ः चार, नगर ग्रामीण ः 15, श्रीरामपूर ः 24, कॅन्टोमेंट ः तीन, नेवासे ः 15, श्रीगोंदे ः 17, पारनेर ः 12, अकोले ः सहा, राहुरी ः 11, शेवगाव ः आठ, कोपरगाव ः तीन, जामखेड ः एक, कर्जत ः पाच. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagar district 465 people were cured of corona