ऐकलं का.. नगर जिल्ह्यात आहेत सर्वाधिक मॉडर्न शेतकरी

विनायक लांडे
गुरुवार, 28 मे 2020

बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरणाची जोड मिळाल्यास कृषी आर्थिक व्यवस्थेला गती मिळेल, या अपेक्षेने सरकारने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान हाती घेतले. त्यातून शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर व औजारांसाठी निधी देण्यात आला.

नगर ः शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन कृषी क्षेत्राला गती मिळावी, या उद्देशाने "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी' मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेत कृषी विभागाने चार वर्षांत जिल्ह्यातील दहा हजार 867 शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर, कृषी औजारांचे वितरण केले. यासाठी तब्बल 61 कोटी 84 लाख 18 हजारांच्या निधीचे वाटप केले. कृषी यांत्रिकीकरणात नगर जिल्हा राज्यात अव्वल स्थानी राहिला आहे.

हेही वाचा - कोरोनाची नगर जिल्ह्यात सेंच्युरी

बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरणाची जोड मिळाल्यास कृषी आर्थिक व्यवस्थेला गती मिळेल, या अपेक्षेने सरकारने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान हाती घेतले. त्यातून शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर व औजारांसाठी निधी देण्यात आला. स्वयंचलित औजारे, उपकरणे, पीक संरक्षण उपकरणे आदींसाठी शेतकऱ्यांना अर्थसाह्याची तरतूदही त्यात होते.

योजना सुरू झाल्यापासून मार्च 2020 अखेर जिल्ह्यातील दहा हजार 867 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. लाभार्थी शेतकऱ्यांना औजारे, पॉवर टिलर, ट्रॅक्‍टरकरिता एकूण 61 कोटी 84 लाख 18 हजार रुपयांचा निधी वितरित केला. 
शेतीचे चक्र गतिमान करणाऱ्या फळबाग, ठिबक सिंचन, शेततळे, पॉलिहाउस, शेडनेटसारख्या योजना राबविण्यात नगर जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच आघाडीवर राहिले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या शेती, सहकाराच्या अंमलबजावणीत कृषी विभागाचे मोलाचे योगदान आहे. 

मागील तीन वर्षांत वितरित 
- 2139 शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरसाठी 24 कोटी 60 लाख 17 हजार 
- 8647 शेतकऱ्यांना औजारांसाठी 36 कोटी 54 लाख 82 हजार 
- 81 शेतकऱ्यांना पॉवर टिलरसाठी 69 लाख 19 हजार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Nagar district has the most modern farmers