esakal | राज्यात नगरचा ‘क्राइम रेट’ सर्वाधिक : पोलिस अधीक्षक पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj patil

राज्यात नगरचा ‘क्राइम रेट’ सर्वाधिक : पोलिस अधीक्षक पाटील

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

राहुरी (जि. नगर) : ‘‘राज्यात सर्वांत जास्त गुन्हेगारी घटना नगर जिल्ह्यात घडतात. मागील वर्षी जिल्ह्यात ४२ हजार, तर पुणे जिल्ह्यात २३ हजार गुन्हे दाखल झाले.‌ पोलिस अधीक्षकपदी रुजू झाल्यावर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान उभे ठाकले. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यान्वित होणारी ग्रामसुरक्षा यंत्रणा महत्त्वाची ठरेल,’’ असा आशावाद पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला. (nagar district has the highest crime rate in the state, said superintendent of police patil)

पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, ‘‘गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात नवीन यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. एका कॉलवर गावभर संदेश जाणार आहे. ही यंत्रणा गावोगावी वापरण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हाभर ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.’’

गोर्डे म्हणाले, ‘‘गावात चोरी- दरोड्याची घटना, वन्य प्राण्यांचा हल्ला, जळिताची घटना, महापूर, अशा आकस्मिक घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत तातडीने मदत मिळविणे, दुर्घटनेस आळा घालणे शक्‍य होणार आहे. याचा पोलिस प्रशासनाला निश्‍चित फायदा होईल. याशिवाय ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील निधन वार्ता, ग्रामसभा, शासकीय योजना, मेळावे, शिबिरे यांचीदेखील माहिती तत्काळ ग्रामस्थांपर्यंत पोचविणे सोपे होईल. गावातील सर्व मोबाईलधारक ग्रामस्थ सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊ शकतात.’’

राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षण वर्गाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक नीलेश वाघ, तुषार धाकवार, तालुक्यातील पोलिस पाटील, तलाठी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

हेही वाचा: नगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला आव्हान

गावावर राहणार ग्रामसमितीचा ‘वॉच’

आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा समित्या स्थापन करण्यात येतील. समितीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असेल. गावात घडणाऱ्या घटनांची माहिती समित्यांद्वारे प्रशासनापर्यंत पोचविली जाणार आहे.

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

loading image