esakal | नगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; खंडपीठाकडून नोटिसा
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar corporation

नगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला आव्हान

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : नगर महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी दाखल केलेल्या याचिकेची न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. एन. लोढा यांच्यासमोर सुनावणी झाली. संबंधितांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत. (Challenging-the-selection-of-sanctioned-corporators-marathi-news-jpd93)

खंडपीठाकडून म्हणणे सादर करण्याच्या नोटिसा

महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी महाराष्ट्र महारानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्‍त्या) नियम २०१२ चे नियम ४ (क) ते ४ (छ) नुसार निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. वैद्यकीय, शिक्षण, सनदी लेखापाल, अभियांत्रिकी, अभिवक्‍ता, सेवानिवृत्त नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिका उपायुक्‍त, सामाजिक कार्यातील अशासकीय संघटनांचे पदाधिकारी स्वीकृत नगरसेवक होण्यास पात्र आहेत.

महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी मदन संपत आढाव, संग्राम बबन शेळके, रामदास नानाभाऊ आंधळे, विपूल मूलचंद शेटिया आणि बाबासाहेब गाडळकर यांनी प्रस्ताव दाखल केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी हे प्रस्ताव फेटाळले होते. बाबासाहेब गाडळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर राजू आसाराम कातोरे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रस्ताव पाठविला. महापालिकेचे तत्कालिन आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

औरंगाबाद खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली आहे. नगरविकास विभाग, महापालिका आयुक्‍त आणि स्वीकृत पाच नगरसेवकांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी ता. सहा सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. याचिकाकर्ते पोकळे यांच्या वतीने ॲड. अमोल गवळी हे काम पाहत आहेत.

हेही वाचा: लग्नाआधीच भंगली सुखस्वप्ने; भावी नवरीने संपविली जीवनयात्रा

काय आहे याचिका कर्त्याचे म्हणणे?

ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, आपण दिव्यांग पुनर्वसन जिल्हा समितीवर दहा वर्षे, तर रेल्वे सल्लागार समितीवर पाच वर्षे काम केले. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला होता. महापालिका प्रशासनाने तो डावलून राजकीय पक्षांशी संबंधितांची वर्णी लावली आहे.

हेही वाचा: SSC Online Result : विषयनिहाय गुणांची प्रत मिळणार

loading image