नगर जिल्ह्याचा खरीप पीक विमा आलाय बरं का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar district kharif crop insurance sanctioned

गेल्या वर्षी खरिपात झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी 239 कोटी 66 लाख रुपये मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यातील नेते, पुढारी, लोकप्रतिनिधींत श्रेयासाठी चढाओढ असल्याचे पाहायला मिळाले. त्या-त्या तालुक्‍यांत तेथील आजी-माजी लोकप्रतिनिधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वृत्तपत्रांना माहिती देऊन आपल्याच प्रयत्नाने पीक विमा मंजूर झाल्याचे वृत्त छापून येत आहे.

नगर जिल्ह्याचा खरीप पीक विमा आलाय बरं का

नगर ः जिल्ह्याला गेल्या वर्षीच्या खरीप पीक विमा योजनेतून 239 कोटी 66 लाख रुपये मंजूर झाले आहेत. यात चार लाख 15 हजार 786 शेतकऱ्यांना तीन लाख तीन हजार 836 हेक्‍टरसाठी हा विमा मिळाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपात पाच लाख 99 हजार 407 शेतकऱ्यांनी तीन लाख 92 हजार 541 हेक्‍टरवरील पिकांचा विमा काढला होता. त्यापोटी 25 कोटी 73 लाख 88 हजार रुपयांचा विमा हप्ता भरला. यातून 997 कोटी 89 लाख रुपये विमा संरक्षित झाले होते. गेल्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात पिकांना ताण बसल्याने फारसे उत्पादन आले नाहीत.

त्यानंतर काढणीच्या काळात परतीचा जोरदार पाऊस झाल्याने प्रामुख्याने बाजरी, कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी झालेल्या नुकसानीचा पीक विमा मंजूर झाला असून, जिल्ह्यातील चार लाख 15 हजार 786 शेतकऱ्यांना तीन लाख तीन हजार 836 हेक्‍टरसाठी 239 कोटी 66 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तालुका पातळीवर या रकमेचे वाटप सुरू असल्याचे सांगण्यात आले. सर्वाधिक रक्कम राहाता तालुक्‍याला मिळाली. 

श्रेयासाठी चढाओढ 
गेल्या वर्षी खरिपात झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी 239 कोटी 66 लाख रुपये मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यातील नेते, पुढारी, लोकप्रतिनिधींत श्रेयासाठी चढाओढ असल्याचे पाहायला मिळाले. त्या-त्या तालुक्‍यांत तेथील आजी-माजी लोकप्रतिनिधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वृत्तपत्रांना माहिती देऊन आपल्याच प्रयत्नाने पीक विमा मंजूर झाल्याचे वृत्त छापून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक विमा योजनेतील लाभाचे श्रेय घेण्याची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. 

तालुकानिहाय मंजूर रक्कम 
तालुका मंजूर रक्‍कम शेतकरी संख्या 
अकोले 2,19,69,548 3,429 
जामखेड 17,66,34,994 66,031 
कर्जत 24,97,83,164 44,002 
कोपरगाव 13,75,13,846 15,791 
नगर 20,78,93,052 33,818 
नेवासे 25,62,06,437 25,232 
पारनेर 32,55,55,867 74,857 
पाथर्डी 14,73,86,765 33,818 
राहाता 33,25,76,758 74,857 
राहुरी 6,71,20,855 10841 
संगमनेर 7,10,76,919 13,270 
शेवगाव 15,26,54,167 27,505 
श्रीगोंदे 15,64,97,961 28,600 
श्रीरामपूर 9,37,23,236 11,085 

संपादन - अशोक निंबाळकर

Web Title: Nagar District Kharif Crop Insurance Sanctioned

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Insurance
go to top