esakal | मंत्री भुजबळांनी सांगितलं गुपित ः नाशिक, नगर-मराठवाड्यातील पाणी संघर्षावर काढलाय तोडगा
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar-Marathwada water issue will be resolved

भुजबळ पुढे म्हणाले, राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली, केंद्राकडे जीएसटीचे 30 हजार कोटी अडकले.

मंत्री भुजबळांनी सांगितलं गुपित ः नाशिक, नगर-मराठवाड्यातील पाणी संघर्षावर काढलाय तोडगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव ः सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या व गुजरातकडे समुद्राला वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यावर राज्याचा हक्क आहे. 100 ते 125 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले तर भविष्यात जिल्ह्या-जिल्ह्यातील भांडणे मिटतील.

राज्याच्या तिजोरीत आत्ता पैसे नाही, परंतु उद्या येतील. प्रसंगी कर्ज काढा म्हणून विधानसभेत मागणी केली आहे असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा ,ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येथील कृष्णाई मंगल कार्यलायात गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समिती बैठक प्रसंगी ते बोलत होते. आमदार आशुतोष काळे, मुख्य अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, काळे कारखाना व्हाईस चेअरमन रोहोम, माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे ,डॉ अजय गर्जे, उपस्थित होते. कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी चालू हंगामात रब्बी एक व उन्हाळी दोन असे तीन आवर्तन देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

भुजबळ पुढे म्हणाले, राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली, केंद्राकडे जीएसटीचे 30 हजार कोटी अडकले. महात्मा फुले योजना, विदर्भ, सोलापूर, लातूर भागातील महापूर यातून कोट्यवधी रुपये खर्च झाला तरी कोरोनाच्या काळात सरकारने आरोग्याला प्राधान्य दिले.

गोरगरिबांना मुबलक अन्नधान्य पुरवठा केला.चालू वर्षी धरण परिसरात कमी पाऊस पडला असून पाण्याचे बाष्पीभवन, गळती व अन्य कारणाने पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याचे सांगून रब्बी खरीपमध्ये तीन आवर्तने सोडण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली.

जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे एक तर तो कायदा संपूर्ण राज्याला लागू करावा किंवा रद्द करावा.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे ,पदमकांत कुदळे डॉ अजय गर्जे, कारभारी आगवान, अशोक खांबेकर, एम टी रोहमारे यांच्यासह शेतकर्यांनी समस्या मांडल्या.

आमदार आशुतोष काळे यावेळी म्हणाले,गोदावरी खोऱ्याचा पाणी प्रश्न बिकट होत असून पश्चिमेच्या पाणी वळवणे किती गरजेचे आहे, हे आता लक्षात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी यात विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा. आवर्तन सोडण्याआधी चाऱ्या दुरुस्ती करावी.

संपादन - अशोक निंबाळकर