नगर पंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचं फाटलं

मार्तंड बुचुडे
Monday, 7 December 2020

या निवडणुका पक्षाने आपापल्या पातळीवर व पद्धतीने लढाव्या लागतील, असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी केले.

पारनेर ः आगामी नगरपंचायत तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर व मोठ्या ताकदीने लढवाव्या लागतील. देश व राज्य पातळीवर निवडणुका आणि गाव पातळीवरील खालच्या निवडणुका यात फरक असतो. या ठिकाणी पक्षीय आघाड्या होत नसतात.

या निवडणुका पक्षाने आपापल्या पातळीवर व पद्धतीने लढाव्या लागतील, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी केले.

आज (ता. 7 ) तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकित कोरेगावकर बोलत होते. या बैठकिस विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, जिल्हा परीषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहकले, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे,शंकर नगरे, नितीन शेळके, निलेश खोडदे, संदीप मोढवे, विजय डोळ आदी सह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थीत होते.

कोरेगावकर पुढे म्हणाले, या पुढे आपली खरी लढाई सुरू होणार आहे. त्या साठी मोठ्या ताकतीने विरोधकांना लढा द्यावा लागणार आहे. एका बाजूला सुजाण व सुसंकृत नेतृत्व तर दुस-या बाजूला दादागिरी करणारे व दडपशाही कराणारे नेतृत्व आहे. त्यामुळे आपणास ही दडपशाही मोडीत काढावयाची आहे त्या साठी एकदिलाने व जोमाने काम करा आपणास खा-या अर्थाने औटी यांच्या विचाराचे राजकारण करावयाचे आहे.

त्या साठी औटी यांच्या सारख्या सज्जन व चांगल्या नेतृत्वाच्या पाठिमागे खंबीरपणे ऊभे रहा असे अवाहन कोरेगावकर यांनी केले. 

औटी म्हणाले, आगामी नगर पंचायतीची निवडणुक विचारात घेता मतदार याद्यांचा चांगला अभ्यास करा, निवडणुकीची चांगली तयारी करा , पक्षाच्या सभासद वाढी साठी प्रयत्न करूऩ नविन सभासदांची नोंदणी करा असे अवाहन केले.

आपण सर्व जण एकदिलाणे लढा दिला तर नगरपंचायत आपल्याच ताब्यात राहाणार आहे त्याची काळजी करण्याच कारण नाही. या वेळी गाडे यांचेही भाषण ाले प्रथम विजय डोळ यांनी उपस्थीतांचे स्वागत तर रामदास भोसले यांनी अभार मानले.
चौकट- औटी यांच्या नेतृत्वाखाली व ताकदीने लढण्याच्या आव्हाणामुळे राज्यात असलेली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीत होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोरेगावकर यांनी आपल्या भाषणात केलेली विरोधकांवरील टिकेचा विचार करता नगरपंचायतीत व ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी होणार नाही असेच चित्र सध्या दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagar Panchayat, Gram Panchayat elections, Mahavikas front split