अकोले : निकालामुळे पिचडांना बळ; डॉक्टरांच्या पोटात कळ

राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना आघाडीची मोठी हार
Nagar Panchayat result in fever of pichad
Nagar Panchayat result in fever of pichad sakal

अकोले : अकोले नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड(Madhukar Pichad)व माजी आमदार वैभव पिचड(Vaibhav Pichad) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादी(NCP) काँग्रेस- शिवसेना आघाडीला मोठी हार पत्करावी लागली. स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसच्या पदरीही निराशा पडली. विरोधकांच्या दबावतंत्रामुळे एका प्रभागातील उमेदवाराने धक्कादायकरीत्या माघार घेतल्यामुळे भाजप- रिपब्लिकन पक्ष युती सोळाच जागा लढवीत होती. त्यांतील बारा उमेदवार विजयी झाले.राष्ट्रवादी काँग्रेस(Congres) व शिवसेनेची आघाडी होती. त्यात राष्ट्रवादी १३ व शिवसेना ४ जागा लढवीत होती. दोघांना प्रत्येकी दोन, अशा केवळ चार जागांवर विजय मिळाला. ११ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या काँग्रेसच्या पदरी फक्त एक जागा पडली.

Nagar Panchayat result in fever of pichad
भाजपातील पिचड पिता-पुत्रांना काँग्रेसची ऑफर, बंद खोलीत चर्चा

महाआघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्यात सुरू असणाऱ्या घोळामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचे अनेक बंडखोर निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे बहुतेक ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत झाली.राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीने प्रथमपासूनच आक्रमक भूमिका घेत प्रचार केला. नगरपंचायतीवर यापूर्वी तुमची सत्ता होती त्यावेळी काय विकासकामे केली याचा हिशेब द्या, असे म्हणत भाजपचे माजी आमदार वैभव पिचड, काँग्रेसचे मधुकर नवले यांना जाब विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बोलावून, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, विकास करण्यासाठी ५० कोटी तीन वर्षांत देतो, असे सांगत प्रचाराचा धुरळा उडवला. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षानेदेखील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे यांच्या सभा घेऊन वातावरण तापवले.

Nagar Panchayat result in fever of pichad
महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून भाजपसोबत : मधुकर पिचड

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनीही, ‘हम भी कुछ कम नहीं’ म्हणत आपले कार्यकर्ते निवडणुकीत कामाला लावले. ठिकठिकाणी बैठका घेत व सोधा राजकारण करून विकास कामे झाले नाही म्हणून मी भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत आलो, असे सांगत पिचड पिता-पुत्रांना बदनाम करण्याचे काम केले. मात्र, त्याचा उपयोग निवडणुकीत झाला नाही.माजी आमदार वैभव पिचड, वसंत मनकर, शिवाजी धुमाळ, सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे यांनी प्रभागांत जाऊन प्रचार केला. राष्ट्रवादीचे सीताराम गायकर, अशोक देशमुख, संपत नाईकवाडी यांच्यात कलगी-तुरा रंगला. भाजपचे दोन उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले. राष्ट्रवादीमधील भांगरे गट, तसेच शिवसेनेचा एक गट प्रचारात सक्रिय दिसला नाही. त्याचा, तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीमधील ‘तू तू मैं मैं’चा फटका

दोघांनाही बसला. दोन वर्षांत तालुक्यात विकासाच्या दृष्टीने विशेष काही घडले नाही. फक्त आश्वासने मिळाली. पिचड पिता-पुत्रांवर केली जाणारी वैयक्तिक टीकाही लोकांना आवडली नाही. या सर्व बाबींचा फटका राष्ट्रवादी आघाडीला बसला. आमदार डॉ. लहामटे व ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाला जनतेने दिलेला हा इशारा असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com