Ahilyanagar: 'नगरपंचायत कामगारांचे उपोषण स्थगित'; मयत कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांना भविष्य निर्वाह निधी मिळालेला नाही
नगरपंचायतीत ज्या कार्यरत कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळालेला नाही व निवृत्त कर्मचारी ग्रॅज्युटीपासून वंचित आहेत, मयत कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांना भविष्य निर्वाह निधी मिळालेला नाही, अशा सर्व कर्मचाऱ्यांतर्फे नेवासा नगरपंचायत चौकात बेमुदत चक्री उपोषण सुरू केले होते.
Nagar Panchayat workers during protest for PF release; families of deceased staff await justice.Sakal
नेवासे शहर : नेवासे नगरपंचायत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघातर्फे मंगळवारी केलेले चक्री उपोषण आयुक्त कार्यालयात कामगारांच्या प्रश्नांविषयी बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.