Nagar: कौतुकामुळे प्रेरणा मिळते : पोपटराव पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोपटराव पवार

कौतुकामुळे प्रेरणा मिळते : पोपटराव पवार

नगर : कामाचे कौतुक झाले की कामे करण्यास आणखी प्रेरणा मिळते. कोरोना काळात शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पद्मश्री’ पुरस्कार वितरण सोहळ्यात भरभरून कौतुक करून शाबासकीची थाप दिली. प्रत्येक पुरस्काराच्या वेळी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या अडचणी म्हणजे मी कामाचे आॅडिट समजतो, असे मत आदर्श गाव प्रकल्प व संकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर आज पोपटराव पवार यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात संवाद साधला. पवार म्हणाले की, गेल्या तीस वर्षांत केलेल्या कामाचे ‘पद्मश्री’ पुरस्कार हे फळ आहे. या फळात फक्त माझेच कष्ट नसून, सर्व ग्रामस्थांचे आहेत. हिवरे बाजारमध्ये गावात कामे करताना पुरस्कारासाठी कधीच काम केले नाही. कामे केली, त्यानंतर पुरस्कार घेतले आहेत. विशेष म्हणजे गावात लोक सहभागातून कामे करण्यात आलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे काम करताना त्यात बदल केला. तो बदल कोरोना काळात उपयोगी ठरला.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

तो आवाज आजही कानात घुमतोय

पुरस्कार स्वीकारायला जाण्याअगोदर कोरोनाची चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. ही तपासणी झाल्यानंतर तेथील पाहणी करत असतानाच वाहनचालकाचा दूरध्वनी आला की रुग्णालयातून धूर निघत आहे. मी मदतकार्याला सुरवात केली. मी पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांशी, जिल्हाधिकारी व अग्निशमन यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्यात सहभागी झालो. नातेवाईक, रुग्ण यांचा त्यावेळचा आवाज आजही कानात घुमतो आहे, असेही पोपटराव पवार म्हणाले.

loading image
go to top