Ahmednagar : लम्पीचे लसीकरण तालुक्यात जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

Ahmednagar : लम्पीचे लसीकरण तालुक्यात जोरात

नगर : तालुक्यातील राळेगण म्हसोबा, मठपिंप्री या गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आला आहे. या परिसरातील तीन जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे खासगी डॉक्टरही लम्पी आजारापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. राळेगण, गुणवडी, वडगाव तांदळी, गुंडेगावसह पाच किलोमीटर परिसरातील ९ हजार जनावरांचे लसीकरण केले आहे.

लम्पी या आजाराचा तालुक्यातील राळेगण म्हसोबा, मठपिंप्री या गावांत शिरकाव झाल्याने शेतकरी, तसेच दुग्धव्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल गडाख, डॉ. संजय महांडुळे, नितीन क्षीरसागर, रामदास आचार्य, मुकुंद उंडे, बापू भापकर, संदीप कुलांगे, शिवराज भापकर यांनी लम्पी स्कीन बाधित गावासह परिसरातील गावांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. बाधित गावापासून पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करण्यात येत आहे.

डास, गोचीड, माश्यांमुळे लम्पी रोगाचा प्रसार होतो. जनावरांच्या अंगावर कडक व गोल आकाराच्या गाठी मान, पाय, कास या ठिकाणी येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. रोगाचे निर्मूलन करण्यासाठी गोठ्याबाहेर फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा. तत्काळ उपाय करून लम्पी रोगाचा प्रभाव रोखता येतो. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.

- डॉ. अनिल गडाख, पशुवैद्यकीय अधिकारी गुंडेगाव

सारोळ्यात औषधांचे वाटप

सारोळा कासार येथील शेतकऱ्यांना लम्पी आजाराबाबत मार्गदर्शन करून सेवा सोसायटीच्या वतीने फॉर्लिन या साथरोगावरील औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. हे औषध जनावरांच्या गोठ्यात फवारावे. त्यामुळे लम्पीचे कीटक नष्ट होतील.

Web Title: Nagar Taluka Veterinary Vaccination Lumpy Virus Animal Cow Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagaranimalVirusCow