esakal | या' जिल्हा परिषदेचे कामकाज आणखी दोन दिवस बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar Zilla Parishad closed for two more days

जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याचा कोरोना मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 28) घडली. त्यांना श्रध्दांजली वाहून प्रशासनाने कामकाज बंद ठेवले.

या' जिल्हा परिषदेचे कामकाज आणखी दोन दिवस बंद 

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याचा कोरोना मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 28) घडली. त्यांना श्रध्दांजली वाहून प्रशासनाने कामकाज बंद ठेवले.

त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचाऱ्यांनी कामकाज आठ दिवस बंद ठेवावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीचा प्रशासनाने विचार करून दोन दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
जिल्हा परिषदेत दोन अधिकारी व चार कर्मचारी कोरोना पाझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित अधिकाऱ्याला श्रध्दांजली वाहून एक दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची असे एकूण सहा जण कोरोना बाधीत निघालेले असून त्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. 

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कामकाज आठ दिवस बंद ठेवावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य व कर्मचाऱ्यांमधून होत होती. या मागणी सकारात्मक विचार करून प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा परिषदेचे कामकाज खबरदारी म्हणून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन दिवसात आज बुधवार (ता. 29)ला जिल्हा परिषदेची सर्व इमारत सॅनिटाईझ करण्यात येणार आहे.

शुक्रवार (ता. 31)ला नियमित कामकाज सुरु राहणार आहे. दोन दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज बंद असले तरी महत्वाची कामे मात्र या दोन दिवसात संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन करावी लागणार आहे. ही कामे करताना मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. शुक्रवारीही फक्त अतिमहत्वाचीच कामे होण्याची शक्‍यता आहे. 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) वासुदेव सोळंके, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या मागणीचा विचार मागणीचा विचार करून प्रशासनाने दोन दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याबरोबरच ज्या कर्मचाऱ्यांना काही आजारापणाची लक्षणे दिसतील त्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून रजा मंजूर करण्याची सूचना दिलेली आहे. 

जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी कामकाज करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना बाधीत आढळून आल्यानंतर साखळी तोडण्यासाठी कामकाज कमीत कमी बंद ठेवण्याचा निर्णय मानवतेचा दृष्टीकोन ठेऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घ्यावा. 
- राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य 

संपादन : अशोक मुरुमकर