नगर जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, हे ठरले मानकरी

दौलत झावरे
Thursday, 10 September 2020

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींच्या यादीला आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्यता दिली.

नगर ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींच्या यादीला आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्यता दिली.

आदर्श शिक्षक व केंद्रप्रमुख पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने 31 ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान निवडप्रक्रिया राबविली. त्यात 100 गुणांची प्रश्‍नावली दिली होती. त्यातून शिक्षक पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. ही यादी विभागीय आयुक्त गमे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविली होती. मात्र, चारित्र्य पडताळणीचे दाखले मिळाले नसल्याने, प्रस्तावाची मंजुरी रखडली होती. चारित्र्य पडताळणीचे दाखल सादर केल्यांतर, विभागीय आयुक्त गमे यांनी त्यास मंजुरी दिली. 

जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी : स्मिता धनवटे (कळस बुद्रुक, ता. अकोले), सुशीला धुमाळ (मिर्झापूर, ता. कोपरगाव), नवनाथ सूर्यवंशी (हरिसन ब्रॅंच, ता. राहाता), वैशाली सोनवणे (ममदापूर, ता. श्रीरामपूर), शोभा शेंडगे (फत्याबाद, ता. राहुरी), दत्तात्रय नरवडे (वांबोरी स्टेशन, ता. राहुरी), रेवणनाथ पवार (ता. नेवासे), जयराम देवढे (चेडे चांदगाव, ता. शेवगाव).

बेग आरीफ युसूफ (निंबादैत्य, ता. पाथर्डी), मुकुंदराज सातपुते (रा. वाकी ता. जामखेड), विजकुमार राऊत (नागलवाडी, ता. कर्जत), शोभा कोकाटे (गोपाळवाडी, ता. श्रीगोंदे), मीनल शेळके (बगेवाडी, ता. पारनेर), जयश्री घोलप (शिंदेवाडी, ता. नगर).

प्रमिला बोर्डे (भातकुडगाव, ता. शेवगाव), उत्तम शेलार (बेलापूर, श्रीरामपूर) या दोन केंद्र प्रमुखांनाही पुरस्कार जाहीर झालेला आहे.

दरवर्षीच शिक्षकदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना असल्यामुळे पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. या पुरस्कारांचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar Zilla Parishad's Adarsh ​​Shikshak Puraskar announced