esakal | नागापूरकरांचाही बाधितांवरील अंत्यसंस्काराला विरोध

बोलून बातमी शोधा

स्मशान सरण

नागापुरकरांचाही बाधितांंवरील अंत्यसंस्कारास विरोध

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः मागील काही दिवसांपासून नागापूर स्मशानभूमीत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यविधी करण्यात येत आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे अंत्यविधी ताबडतोब थांबवावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

सप्रे यांनी सहायक आयुक्‍त सचिन राऊत यांना निवेदन दिले. यावेळी भागचंद भाकरे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की नागापूर अमरधाममध्ये कोरोनाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हे अंत्यविधी तत्काळ थांबवावेत. स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने ती ताब्यात घेऊन सुशोभीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सप्रे यांनी निवेदनात दिला आहे.