विरोधकांना रसद नेमकी कुणाची? | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागवडे कारखाना निवडणूक

अहमदनगर : नागवडे कारखाना निवडणूक; विरोधकांना रसद नेमकी कुणाची?

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : नागवडे कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरु असून आमदार बबनराव पाचपुते यांच्या सौम्य भुमिकेनंतरही निवडणूकीत अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्याविरुध्दचे वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे या विधानसभा लढविणार हे निश्चित झाल्याने आता नागवडे कुटूंबाला कारखान्यातच थांबविण्यासाठी राजकीय डावपेच टाकले जात आहेत. विरोधकांना जिल्ह्याच्या की तालुक्याच्या उत्तरेतून रसद पुरविली जात आहे. याबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

तालुक्यातील शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. उसाचे वेळेवर पेमेंट, कामगारांचीही पगाराची ओरड नाही, कारखान्यात कारभारही चांगला सुरु असल्याचा दावा सत्ताधारी नागवडे करीत असतानाच विरोधकांनी मात्र आरोप करुन निवडणूकीत रंगत भरण्याचे काम सुरु केले. एकीकडे नागवडे कारखाना निवडणूकीची वादळी चर्चा जिल्हाभर रंगत असतानाच कुकडी कारखान्याची अजिबातच चर्चा होत नसल्याचे दिसते. कुकडीत अध्यक्ष राहूल जगताप यांच्याविरुध्द माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर यांनी सुप्त मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, पंधरकर यांना तालुक्यातील इतर नेत्यांचे पाठबळ मिळत नसल्याचे दिसते. तरीही त्यांनी निवडणूक टोकाची करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: नागपूर : एसटी कर्मचाऱ्याचा भरीत-भाकरीवर ताव

दरम्यान, नागवडे कारखान्याची निवडणूक मात्र गाजत आहे. शिवाजीराव नागवडे यांचा पुतळा अनावरणासाठी शरद पवार आल्यानंतरही विरोधकांनी शांततेची भुमिका घेतली नाही. बापुंची सहानुभुती सत्ताधाऱ्यांसोबत असली तरी प्रमुख विरोधक असणारे केशवराव मगर हेही बापु यांचेच कट्टर समर्थक असल्याने निवडणूक गाजेल.

नागवडे विरोधकांना नेमकी रसद कोण पुरवित आहे याची जोरदार चर्चा सुरु आहे. अण्णासाहेब शेलार, जिजाबापु शिंदे हे नेते खासदार डाॅ. सुजय विखेपाटील यांचे खंदे समर्थक आहेत. त्याशिवाय शेलार व राहूल जगताप यांची मैत्री सर्वश्रुत आहे. केवळ मैत्रीपुरतीच नाही तर शेलार हे जगताप यांचे मार्गदर्शकही आहेत. सध्या नागवडेंविरोधात शेलार आग ओकत असल्याने त्यांच्यामागे नेमकी कुणाची शक्ती आहे, याची चर्चा सुरु आहे. या सर्व घडोमाडीत बबनराव पाचपुते आजारी असल्याने सौम्य भुमिकेत आहेत. तरीही वातावरण नागवडेंविरुध्द नेमके कोण पेटवित आहे, याचा शोध अनेक राजकीय जाणकार घेत आहेत.

नागवडेंच्या मदतीची परतफेड करणार का?

आमदार पाचपुते यांना राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश करुन विधानसभेला थेट मदत केली होती. शिवाजीराव नागवडे यांनी राहूल जगताप यांना आमदार करण्यात मोठा वाटा उचलला होता. आता कारखाना निवडणूकीत हे दोघे नागवडेंच्या उपकाराची परतफेड कशी करणार याचीच चर्चा आहे. पाचपुते शांत बसले आणि जगतापांनी अण्णासाहेब शेलार यांना शांत केली की ही परतफेड होईल, अशीही चर्चा आहे.

loading image
go to top